Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यंदा जायकवाडी धरणामध्ये पाण्याची मोठी तूट – इंजि. चकोर

नाशिक-नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यास विरोध

राहुरी ः मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, अहमदनगर या जिल्ह्यांसाठी संजीवनी असलेल्या व गोदावरी नदीवर पैठणजवळ बांधण्यात आलेल्या

जायकवाडी धरणात केवळ 26 टक्केच जलसाठा शिल्लक
तर नगर-नाशिक जिल्ह्यातील नद्यातून जायकवाडीला सोडावे लागणार पाणी
जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय कायम

राहुरी ः मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, अहमदनगर या जिल्ह्यांसाठी संजीवनी असलेल्या व गोदावरी नदीवर पैठणजवळ बांधण्यात आलेल्या जायकवाडी धरणामध्ये 15 ऑक्टोबरपर्यंत एकूण पाणीसाठा 62.2105 टी.एम.सी. (60.56) टक्के व उपयुक्त पाणीसाठा 36.1443 टी.एम.सी.(47.14) इतका असून गतवर्षीच्या उपयुक्त पाणीसाठापेक्षा तो सुमारे 40 टी.एम.सी.(53 टक्के) कमी आहे. त्यामुळे वरील नमूद जिल्ह्यांतील शेतीसिंचनावर मोठा परिणाम होणार असून पिण्याचे पाण्याचा सुद्धा काटकसरीने वापर करण्याची आवश्यकता भासणार असल्याचे अभियंता हरिश्‍चंद्र चकोर, जलसंपत्ती अभ्यासक व से. नि.अभियंता जलसंपदा विभाग, संगमनेर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
पुढे बोलतांना चकोर म्हणाले की, जायकवाडी धरण बांधताना धरण स्थळी उपलब्ध होणारा यिल्ड लक्षात घेऊनच या धरणाचा एकुण पाणीसाठा 102.73 टी.एम.सी. निश्‍चित करण्यात आला होता. परंतु जायकवाडी धरणाच्या वरील(उर्ध्व )भागामध्ये गोदावरी नदी च्या खोर्‍यात नाशिक व नगर जिल्ह्यात जनतेच्या मागणी व गरजेनुसार मोठ्या प्रमाणात धरणे बांधण्यात आली व त्यामुळे वरील भागाचा पाणी वापर जवळपास एकशे पंधरा(115) टी.एम.सी. पर्यंत गेलेला आहे आणि तो भविष्यात 145 ते150 टी.एम.सी. पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे जायकवाडी धरणामध्ये मोठी पाणी तूट सातत्याने यापुढे निर्माण झालेली पाहायला मिळणार आहे व त्या अनुषंगाने मराठवाडा विरुद्ध नाशिक-नगर हा संघर्ष सातत्याने उग्ररूप धारण करणार आहे. या सर्व बाबींच्या व अडचणींच्या पार्श्‍वभूमीवर सन 2005 मध्ये शासनाकडुन समन्यायी पाणी वाटप कायदा मंजूर करण्यात आला आणि त्यानुसार मेंढीगिरी समितीच्या काही शिफारशी स्वीकारण्यात करण्यात आल्या. त्यामध्ये जायकवाडी धरणात दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी सुमारे 49.84 टी.एम.सी. म्हणजेच 65 टक्के टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा प्रथमतः करण्यात यावा तनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील गोदावरी धरण समूह व नगर जिल्ह्यातील मुळा प्रवरा धरण समूहांमधून जायकवाडी धरणामध्ये 65 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी कमी पडणारे पाणी सोडण्यात यावे आणि त्यानुसार जायकवाडी धरणामध्ये दरवर्षी च्या 15 ऑक्टोबर रोजीचा उपयुक्त पाणीसाठा विचारात घेऊन पुढील रब्बी व उन्हाळी हंगामासाठी म्हणजे सिंचनासाठी विचारात घेतला जातो. सुमारे 49.84 टी.एम.सी. इतका उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच 65  टक्के इतका पाणीसाठा प्रथमतः करण्यात यावा व त्यासाठी वरील धरणांमधून पाणी सोडण्यात यावे असे नमूद केले आहे व त्या अटीनुसारच वेळोवेळी जायकवाडी धरणामध्ये नाशिक जिल्ह्यातील गोदावरी धरण समूहांमधून व अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे व मुळा धरण (प्रवरा- मुळा नदी ) धरण समूहांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडलेले आहे. मात्र यावर्षी जायकवाडी धरणामध्ये या वर्षीच्या 15 ऑक्टोबर रोजी जायकवाडी धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा हा 36.14 टी.एम.सी. म्हणजेच (47.14%) टक्के इतका असून साधारणतः तो 13.70 टी.एम.सी. वापरण्यासाठी कमी(शॉर्ट फॉल)प्रमाणात उपलब्ध होणार आहे .त्यास्तव जायकवाडी धरणात नाशिक-नगर जिल्ह्यातील धरणांमधून साधारणतः दहा ते अकरा(10ते11) टी.एम.सी. इतके पाणी सोडणे अपरिहार्य ठरणार आहे. त्या अनुषंगाने मराठवाडा पाणी परिषद व जनतेकडुन नाशिक नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. मात्र त्याचबरोबर नगर व नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाणी सोडू नये अशी जोरदार मागणी होत असून पाणी सोडण्याच्या कार्यवाहीला मोठ्या प्रमाणात विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

COMMENTS