Homeताज्या बातम्या

सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक अल्ताफ शेख यांची बीडच्या ऐतिहासिक वैभवाला भेटकारंजा टॉवर, कंकालेश्वर मंदिर, शहिंशाहवली व मन्सूरशहा दरगाह रुपेरी पडद्यावर आणण्याची इच्छा

बीड : मराठी, हिंदी, कन्नड आणि तेलगू चित्रपटसृष्टीत आपल्या दिग्दर्शन व लेखनाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक,

हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
आमच्या या जन्मात तरी हे रस्ते चांगले तयार होतील का?बीड शहरवासीयांमधून उद्विग्न प्रश्न  
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदलेले सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अल्ताफ शेख बीडमध्ये येणारसा. ‘युवा लोकमित्र’च्या वर्धापन दिन पुरस्कार वितरण सोहळ्यात विशेष उपस्थिती


बीड : मराठी, हिंदी, कन्नड आणि तेलगू चित्रपटसृष्टीत आपल्या दिग्दर्शन व लेखनाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक अल्ताफ शेख यांनी बीड शहरातील ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन या वास्तूंची पाहणी केली. बीडच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाने प्रभावित झालेल्या अल्ताफ शेख यांनी भविष्यात योग्य कथानक मिळाल्यास येथील ऐतिहासिक वास्तूंना रुपेरी पडद्यावर स्थान देण्याची इच्छा व्यक्त केली.
शहरातील प्रसिद्ध कारंजा टॉवर, कंकालेश्वर मंदिर, शहिंशाहवली दरगाह आणि मन्सूरशहा दरगाह या ऐतिहासिक स्थळांना त्यांनी भेट दिली. या वास्तूंची रचना, त्यामागील इतिहास, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व याबाबत माहिती घेताना ते भारावून गेले. ऐतिहासिक वास्तूंमध्ये चित्रपटासाठी आवश्यक असलेली पार्श्वभूमी, सौंदर्य आणि कथानकाला पूरक ठरणारी वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी नमूद केले. बीड शहरातील मुक्त पत्रकार एस. एम. युसूफ़ यांच्या निमंत्रणावरून अल्ताफ शेख हे ‘सा. युवा लोकमित्र’ वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून बीड येथे आले होते. यावेळी एस. एम. युसूफ़ तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी त्यांना बीड शहरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती देत प्रत्यक्ष भेट घडवून आणली. इतिहास आणि संस्कृतीशी जोडलेल्या या वास्तू पाहून अल्ताफ शेख यांनी दिग्दर्शकाच्या नजरेतून त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठेवा अधिक व्यापक पातळीवर पोहोचण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम ठरू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. कथानकाला अनुरूप संधी मिळाल्यास बीडच्या या ऐतिहासिक स्थळांचे चित्रीकरण करून त्यांना रुपेरी पडद्यावर दाखविण्यास आपण नक्की प्रयत्न करू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक इमरान कादरी यांची उपस्थिती होती. अल्ताफ शेख यांच्या या भेटीमुळे बीडच्या ऐतिहासिक वारशाला चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळण्याची आशा व्यक्त होत आहे.

COMMENTS