Homeताज्या बातम्या

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या सात गोवंशीय जनावरांची सुटका; माजलगावात दोन आरोपींना अटक

माजलगाव : माजलगाव शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या सात गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. या प्रकरण

बिनागुंडाच्या जंगलातील माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; गडचिरोली पोलिसांचे मोठे यश
शिर्डी आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात ‘कलाकार’ची चर्चा; पुणतांब्याच्या प्रवीण जोगदंडला ‘परीक्षक विशेष पुरस्कार’
सह्याद्री उजळला काजव्यांच्या मायावी प्रकाशाने! अकोलेतील ‘काजवा महोत्सवा’ला पर्यटकांची झुंबड; निसर्गाचा अद्भुत सोहळा

माजलगाव : माजलगाव शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या सात गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी चांदणी ग्राउंड परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेली तीन गोवंशीय जनावरे आढळून आली. पोलिसांनी तत्काळ छापा टाकून या जनावरांची सुटका केली आणि त्यांना गोशाळेत दाखल केले. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच दिवशी मनूर रोडलगत असलेल्या दुसऱ्या पत्र्याच्या शेडमधूनही पोलिसांनी चार गोवंशीय जनावरांची सुटका करत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला.

दरम्यान, ३० मे २०२६ रोजी माजलगाव शहर हद्दीत गोवंशीय जनावरांचे अवयव उघड्या जागी टाकल्याप्रकरणी अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान इम्रान शकील कुरेशी (वय ३८, रा. गांधनपुरा, माजलगाव) व जफर गफार कुरेशी (रा. खाटीक गल्ली, माजलगाव) यांची नावे निष्पन्न झाली असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

COMMENTS