Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मानवी दु:ख मुक्तीचा राजमार्ग म्हणजे बौद्ध धर्म ः प्रा.प्रशांत चव्हाण

जामखेड ः बौद्ध धर्म हा मानवी कल्याणाचा पुरस्कर्ता, सुख दुखाच्या परिकल्पना अधिक स्पष्ट करणारा असून त्यामध्येच  दु:ख मुक्तीचा राजमार्ग असल्याचे प्र

नपुर शर्माला समर्थन दिले म्हणुन तरूणावर झाला हल्ला.
निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदारांसाठी मतदार सुलभता केंद्रांची स्थापना
*”माधव” समाजाकडून बारा-बलुतेदार, अठरा अलुतेदारांच्या आरक्षणावर गदा… l Lok News24

जामखेड ः बौद्ध धर्म हा मानवी कल्याणाचा पुरस्कर्ता, सुख दुखाच्या परिकल्पना अधिक स्पष्ट करणारा असून त्यामध्येच  दु:ख मुक्तीचा राजमार्ग असल्याचे प्रतिपादन प्रा प्रशांत चव्हाण यांनी केले. जामखेड येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ’67 व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त’ आंबेडकरी विचारवंत प्रा.प्रशांत चव्हाण यांच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रा.चव्हाण म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर,1956 साली अशोक विजया दशमीच्या दिवशी स्पृश्य-अस्पृश्य भेद करणार्‍या हिंदू धर्माचा त्याग करून, स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाची शिकवण देणार्‍या बौद्ध धर्माचा आपल्या लाखो अनुयायांसह स्वीकार करून जगातील सर्वात मोठा धर्मांतर सोहळा घडवून आणला. तेव्हापासून गावकुसाबाहेर अंधकारमय जीवन जगणार्‍या समाजाचे, बौद्ध धर्माच्या माध्यमातून जीवन उजाळून निघाले आहे. केंद्रीय शिक्षिका सुरेखाताई सदाफुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात अ‍ॅड. अरुण जाधव, विकीभाऊ सदाफुले, संतोष गव्हाळे, बापुसाहेब गायकवाड, आतिष पारवे, बापूसाहेब ओव्हळ, हरिभाऊ कदम गुरुजी, प्रभाकर सदाफुले, सिद्धार्थ साळवे, ज्ञानदेव साळवे, सतिष सदाफुले, सचिन सदाफुले, रंजन नाना मेघडंबर, राजन समिंदर, विनोद सोनवणे, भालेराव, प्रा.राहुल अहिरे, आदींसह महिला उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सुरेखाताई सदाफुले यांनी बोलतांना समाजातील धार्मिक उदासिनतेबाबत काळजी व्यक्त केली. धार्मिक कार्याबाबत लोक सहकार्य करण्याचे सोडून, झोपेचे सोंग घेत असल्याने उघड नाराजीही व्यक्त केली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले नान्नज येथील ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण साळवे व मोहा येथील चंद्रकांत जावळे यांचा तसेच जिल्हा संघटकपदी नियुक्ती झाल्याबद्दल बौद्धाचार्य अशोक आव्हाड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला. तसेच, यावेळी वंचितचे राज्याचे नेते अँड. अरुण जाधव यांनी अन्नदान केले.

COMMENTS