Homeताज्या बातम्या

शासकीय कार्यालयांमध्ये वेळेत सेवा द्यागैरहजर अधिकारी-कर्मचार्‍यांवर कारवाई करा – आ. केराम

किनवट-माहूर तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी नियमितपणे उपस्थित राहत नसल्याच्या तसेच महसूल विभागातील कौटुंबिक फेरफार, व

नांदेड विमानतळावर आंतरराष्ट्रीय टर्मिनल उभारणीच्या निर्णयाचे स्वागतविकासाला मिळणार नवी गती – डॉ. विजय सतबीरसिंघ
परीक्षा घोटाळ्यावरून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके समर्थकांसह दिल्लीत आंदोलनासाठी सज्ज!
यु-डायस क्रमांकाविना इंग्रजी शाळांचा सुळसुळाट; शिक्षण विभागाच्या ‘मूकसंमती’मुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ?



किनवट-माहूर तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी नियमितपणे उपस्थित राहत नसल्याच्या तसेच महसूल विभागातील कौटुंबिक फेरफार, वारसा फेरफार आणि इतर महसुली प्रकरणे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असल्याच्या नागरिकांच्या तक्रारींची आमदार भीमराव केराम यांनी गंभीर दखल घेतली आहे.
यासंदर्भात आ. केराम यांनी उपविभागीय अधिकारी, किनवट यांना पत्र देऊन तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचार्‍यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करावी, नागरिकांची कामे वेळेत व पारदर्शक पद्धतीने मार्गी लावावीत तसेच प्रलंबित महसुली प्रकरणांचा विशेष आढावा घेऊन त्यांचा निश्चित कालमर्यादेत निपटारा करावा, अशा सूचना केल्या आहेत. याशिवाय विनाकारण गैरहजर राहणारे अथवा नागरिकांच्या कामात अनावश्यक दिरंगाई करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, प्रशासन अधिक जबाबदारीने व नागरिकाभिमुख पद्धतीने काम करावे, हीच या सूचनांमागील भूमिका असल्याचे आ. केराम यांनी नमूद केले आहे. किनवट-माहूरसारख्या दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना वेळेत व दर्जेदार शासकीय सेवा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करून प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, अशा स्पष्ट सूचना आमदार भीमराव केराम यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

COMMENTS