जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होणार? अजित पवार म्हणाले…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होणार? अजित पवार म्हणाले…

प्रतिनिधी : मुंबई प्रत्येकाला आपल्या पक्षाची ताकद वाढविण्याचे स्वतंत्र आहे . त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणाबरोबर आघाडी करायच

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला मोठा झटका… नेत्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात
राहुरीत गावकीच्या सहकाराचे धुराडे पेटले
आता वर्षातून चार वेळा होणार मतदार नोंदणी

प्रतिनिधी : मुंबई

प्रत्येकाला आपल्या पक्षाची ताकद वाढविण्याचे स्वतंत्र आहे . त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणाबरोबर आघाडी करायची याचा निर्णय राष्ट्रवादीकडून त्या-त्या जिह्याला देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली .

राज्यातील काही जिह्यात व शहरात कुठे काँग्रेसची, कुठे शिवसेनेची तर कुुठे राष्ट्रवादीची ताकद आहे. अशावेळी प्रत्येकाला अधिक जागा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरु असतो .

स्थानिक पातळीवरच याबाबतचा निर्णय होण्यासाठी राष्ट्रवादीकडून त्या-त्या जिह्यातील नेत्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील निर्णय घेता येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली .

राज्यात येत्या काळात महापालिका आणि नगर परिषद निवडणुका (Upcoming Elections) पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षाने कंबर कसली असून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे . 

राज्यात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) रुपात शिवसेना, राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर हे पक्ष स्वबळावर लढतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे . हे पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठी घोषणा केली.

COMMENTS