कोपरगाव : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने उद्योगाभिमुख अभियंते घडविण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असून, विद्यार्थ्यांमध

कोपरगाव : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने उद्योगाभिमुख अभियंते घडविण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असून, विद्यार्थ्यांमधील कौशल्य आणि नाविन्यपूर्ण कल्पना पुढे याव्यात यासाठी प्रकल्प स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धांमधून विध्यार्थ्यांना त्यांनी आत्मसात केलेली कौशल्ये सादर करण्याची संधी मिळते, तसेच मंडळाकडून लाखो रुपयांची बक्षिसेही दिली जातात, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयाचे उपसचिव देवेंद्र दंडगव्हाळ यांनी केले.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ प्रायोजित व संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निक आयोजित राज्य स्तरीय प्रकल्प स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी दंडगव्हाळ बोलत होते. संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी डाॅ. राजेंद्र कावळे, डाॅ. डाॅ. एम. बी. कोकरे, विविध विभाग प्रमुख व डीन्स व्यसपीठावर उपस्थित होते. एम.एस.बी.टी.ई. मार्फत प्रथम प्रकल्प विजेत्या संघाला एक लाखांचे तर दुसऱ्या क्रमांकाच्या संघास ५० हजारांचे बक्षिस होते.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना अमित कोल्हे यांनी सांगितले की, प्रोजेक्ट स्पर्धांच्या माध्यमातून विध्यार्थ्यानी नवकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव घेत शिकणे अत्यंत आवश्यक आहे. अशा स्पर्धांच्या आयोजनामागे एमएसबीटीईचा दूरदृष्टीपूर्ण उद्देश असून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची व नवोन्मेशाची वृत्ती विकसित करणे हा त्याचा मुख्य हेतू आहे. प्रकल्प स्पर्धेचे समन्वयक प्रा. योगेश जगताप यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.संदीप पाटील यांनी आभार मानले.

COMMENTS