श्रीगोंदा : हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरहून तब्बल ११ लाख रुपये आणि फर्निचर आणण्याची मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फिर्यादी जरीनन मुदस्सर मालजणे (वय ३२, मूळ रा. श्रीगोंदा, सध्या रा. कादरी मशिदीजवळ, मुकुंदनगर) यांच्या तक्रारीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१७ साली मुस्लिम रिवाजानुसार जरीनन यांचा विवाह मुदस्सर मालजणे याच्याशी झाला होता. विवाहानंतर काही वर्षे संसार सुरळीत सुरू होता. त्यावेळी पती श्रीगोंदा पंचायत समितीत काम करत होता. सासरच्यांनी २०२४ पर्यंत विवाहितेला व्यवस्थित नांदवले; मात्र त्यानंतर परिस्थिती बदलली.हॉटेल टाकण्यासाठी माहेरहून ११ लाख रुपये आणि फर्निचर आणावे, अशी मागणी पती व सासरच्यांकडून वारंवार करण्यात येऊ लागली. पैसे न आणल्याने विवाहितेला उपाशी ठेवणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करणे अशा प्रकारे मानसिक व शारीरिक छळ सुरू करण्यात आला. इतकेच नव्हे तर जीवे मारण्याची धमकी देत तिला घराबाहेर हाकलून दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.या सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने यापूर्वी भरोसा सेलमध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र, तिथे समाधान न झाल्याने पोलिसांनी पुढील कारवाईसाठी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला.त्यानुसार दिलेल्या सविस्तर फिर्यादीवरून पती मुदस्सर अस्लम मालजणे, सासू हमीदा अस्लम मालजणे, दीर मोहसीन अस्लम मालजणे, जाऊ तमन्ना मोहसीन मालजणे (सर्व रा. वडाळी रोड, आयआयटी कॉलेजसमोर, श्रीगोंदा) तसेच नणंद आसमा मुदस्सर शेख आणि नंदावा मुदस्सर शेख (दोघे रा. कुम्हार गल्ली, दौंड, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांवरील अत्याचाराचे प्रकार अद्यापही सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

COMMENTS