Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अजय देशमुख यांना पीएचडी प्रदान

श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील उपक्रमशील शिक्षक अजय रामचंद्र देशमुख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएचडी (डॉक्टरेट) पदवी प्रदान केली आहे.

अखेेर दोन आठवड्यांचा युद्धविराम; होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याची अमेरिकेची अट
अखेेर दोन आठवड्यांचा युद्धविराम; होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याची अमेरिकेची अट
पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बीड प्रसारचे पत्रकार शेख सद्दाम यांचा सत्कार
जागतिक दर्जाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - अभिजीत भारत | Abhijeet  Bharat | Latest Hindi & Marathi News

श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील उपक्रमशील शिक्षक अजय रामचंद्र देशमुख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएचडी (डॉक्टरेट) पदवी प्रदान केली आहे. अजय देशमुख यांनी “महाराष्ट्र राज्यातील निरीक्षण गृहातील विधिसंघर्षित विद्यार्थ्यांच्या समायोजनासाठी राबविलेल्या उपक्रमांच्या परिणामकारकतेचा अभ्यास” या विषयावर विद्यापीठास शोधनिबंध सादर केला होता. त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेत विद्यापीठाने त्यांना ही मानाची पदवी बहाल केली.

त्यांनी निर्मलाताई थोपटे शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथील संशोधन केंद्रातून हा शोधनिबंध सादर केला. या संशोधनासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या चव्हाण तसेच मार्गदर्शिका डॉ. भाग्यश्री बिचुकले यांचे मार्गदर्शन लाभले. संशोधनाच्या निमित्ताने अजय देशमुख यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करत विविध निरीक्षण गृहांना भेटी दिल्या आणि विधिसंघर्षित विद्यार्थ्यांच्या पुनर्वसन व समायोजनासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या या यशाबद्दल सहकार महर्षी नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, माजी आमदार संग्राम थोपटे, आमदार सुनील शेळके तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक रामदास ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS