Homeताज्या बातम्या

प्रवरा नदीत बुडालेल्या ऋषिकेशचा दहाव्या दिवशी शोध; धानोरे येथे मृतदेह आढळला

देवळाली प्रवरा : संगमनेर शहरातील गंगामाई घाट परिसरात प्रवरा नदीत पोहताना बेपत्ता झालेल्या पारेगाव बुद्रुक येथील ऋषिकेश नवनाथ गडाख (वय २५) या तरुण

आष्टी पोलिसांची धडक कारवाई; २४३ गुन्ह्यांतील ७.८४ लाखांचा अवैध दारूसाठा नष्ट!
गटविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा
दडपशाही नको, संवाद हवा !
मोठी बातमी! प्रवरा नदीत शोधकार्य सुरू असताना SDRF ची बोट उलटून तिघांचा  मृत्यू | SDRF boat overturned in pravara river in ahmednagar three died two  missing

देवळाली प्रवरा : संगमनेर शहरातील गंगामाई घाट परिसरात प्रवरा नदीत पोहताना बेपत्ता झालेल्या पारेगाव बुद्रुक येथील ऋषिकेश नवनाथ गडाख (वय २५) या तरुणाचा अखेर दहाव्या दिवशी शोध लागला. राहुरी तालुक्यातील धानोरे येथील प्रवरा नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला. नदीच्या तीव्र प्रवाहामुळे संगमनेर येथून वाहत आलेला हा मृतदेह धानोरेपर्यंत पोहोचला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह ऋषिकेश गडाख याचाच असल्याची प्राथमिक माहिती असून, ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

ऋषिकेश गडाख हा काही दिवसांपूर्वी मित्रांसोबत संगमनेर शहरातील गंगामाई घाट परिसरात प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी असून प्रवाहही अत्यंत वेगवान होता. पोहत असताना अचानक तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि विविध बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली.

ऋषिकेशचा शोध घेण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून प्रवरा नदीपात्रात विविध ठिकाणी युद्धपातळीवर शोध घेण्यात येत होता. बोटी, ड्रोन तसेच विविध बचाव उपकरणांच्या साहाय्याने नदीपात्र, नदीकाठ आणि संभाव्य ठिकाणी तपासणी करण्यात आली. मात्र, नदी दुथडी भरून वाहत असल्याने शोधमोहीम अत्यंत जोखमीची ठरत होती. प्रवरेच्या वेगवान प्रवाहाबरोबरच नदीपात्रातील वाढलेली खोली, धोकादायक वळणे, खोल खड्डे, दगड तसेच पाण्याखालील विविध अडथळ्यांमुळे बचाव पथकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. प्रतिकूल परिस्थिती असतानाही बचाव पथकांनी दिवस-रात्र शोधकार्य सुरू ठेवले.

दहाव्या दिवशी धानोरे (ता.राहुरी) येथील प्रवरा नदीपात्रात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. नदीच्या तीव्र प्रवाहामुळे हा मृतदेह संगमनेरहून वाहत धानोरेपर्यंत आला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

विविध पथकांचा शोधकार्यात सहभाग या शोधमोहीमेत राहुरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथक, ईआरटी रेस्क्यू टीम, अहिल्यानगर, संगमनेर नगरपालिका फायर अँड रेस्क्यू टीम, रक्षक दल, आपदा मित्र, मास्टर ट्रेनर्स, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. अनिल जाधव, रामदास गायकवाड, प्रशांत पांडे, नवनाथ सिनारे, गोपाल भोर, हेमंत कारले यांच्यासह अनेक बचाव कर्मचाऱ्यांनी सलग दहा दिवस अथक परिश्रम घेतले.

COMMENTS