शेवगाव : रविवारी (दि. ९) शेवगाव येथील विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सदस्य प्रा. किसन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बोधेगाव येथी

शेवगाव : रविवारी (दि. ९) शेवगाव येथील विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सदस्य प्रा. किसन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बोधेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बन्नूभाई शेख, धोंडिराम मासाळकर, सादिक पठाण, अफसर शेख यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहिर प्रवेश केला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शाहुराव खंडागळे, कल्याणराव भागवत पाटील, तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, उपाध्यक्ष अरुण झाबंरे पाटील, विशाल इंगळे, युवा तालुका उपाध्यक्ष सागर गरुड, विष्णु वीर रज्जाक सैय्यद, दिलीप वाघमारे, ज्येष्ठ मार्गदर्शक हाजी मुसाभाई, राजूशेठ आहुजा, व ईतर सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रसंगी प्रा. किसन चव्हाण म्हणाले की वंचित बहुजन आघाडी मध्ये कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सर्वात जास्त महत्व आहे. जसे इतर पक्षात कार्यकर्त्यांना वापरून घेतले जाते, सतरंज्या उचलण्यासाठी त्यांचा वापर होतो, वंचितकडे भलेही द्यायला सत्ता नसेल पैसा नसेल पण वंचित मध्ये कार्यकर्त्यांना वापरून न घेता त्यांना मान सन्मान सामाजिक प्रतिष्ठा मात्र दिली जाते. कार्यकर्त्यांनी सामाजिक भान ठेऊन निष्ठापूर्वक कामे करावीत. भविष्यात राज्यात वंचित बहुजन आघाडी हा पक्ष एक निर्णायक अशी राजकीय ताकत असेल.
यावेळी वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव भागवत पाटील, शेख प्यारेलालभाई, अरुण झांबरे पाटील, सागर गरुड यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हाउपाध्यक्ष शाहुराव खडांगळे यांनी केले तर सर्व उपस्थितीतांचे सुरेश खंडागळे यांनी आभार व्यक्त केले.

COMMENTS