Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गणेशची सत्ता गेली तरी ऋणानुबंध कायम ः खासदार डॉ. विखे

राहाता ः गणेश कारखान्याची सत्ता गेली आसली तरी ऋणानुबंध कायम आहेत हे संबध संस्था म्हणून नव्हे तर माणुसकीचे नाते आहे, राहाता तालुकाच विखे पाटील परि

विखेंच्या नाकाखालील डोंगर पोखरला, खासदार झाले संतप्त
जिल्हा नामांतराचा निर्णय घेतला तर, त्याचे पडसाद उमटतील…
शिवसेना त्यांनी राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली

राहाता ः गणेश कारखान्याची सत्ता गेली आसली तरी ऋणानुबंध कायम आहेत हे संबध संस्था म्हणून नव्हे तर माणुसकीचे नाते आहे, राहाता तालुकाच विखे पाटील परिवारासाठी कुटुंब आहे, गणेशला विरोधात मतदान करणार्‍यांना देखील आपण फरकाचे तीनशे रुपये दिले आहेत, असे काम फक्त विखे पाटील परिवारच करु शकते असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी एकरुखे येथील मोफत साखर वाटपाच्या प्रसंगी केले. यावेळी डॉ. विखे यांची रथातून भव्य अशी मिरवणूक काढत फुलांचा वर्षाव करत व ढोल ताशांच्या गजरात त्यांचे एकरुखे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.  
 यावेळी बोलतांना डॉ. विखे म्हणाले की, जे या तालुक्यामध्ये येऊन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव जनतेच्या मनातून उतरवण्याचे काम करत आहे, अशा सर्व लोकांना  करुखे येथील कार्यक्रमच उत्तर आहे. गरीबांची दिवाळी गोड होण्याचा आपला उद्देश असून पुढील एका वर्षामध्ये शिर्डी येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठी एमआयडीसी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून उभी करणार आहे. प्रत्येक घरातील एकतरी मुलगा किंवा मुलगी नोकरीस घेणार असे खासदार डॉ.विखे म्हणाले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धनंजय सोनवणे यांनी केले. तर यावेळी एकरुखे गावचे सरपंच जितेंद्र गाढवे, उपसरपंच सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जालिंदर गाढवे, संचालक देवेंद्र भवर, गणेश थोरात, गोरक्षनाथ मोटे, आनंदा पगारे, मिनिनाथ आग्रे, संदीप क्षीरसागर, दिगंबर भवर, ललित कार्ले, सुरेश सातव, सतिष लुटे, गणेश पगारे, भाऊसाहेब गाढवे, मच्छिंद्र आभाळे, रघुनाथ बोर्डे, मारुती नालकर, व एकरुखे येथील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS