Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जि.प. शाळा रावी येथे ‘शाळा पूर्वतयारी मेळावा’ उत्साहात संपन्न

मुक्रमाबाद : शिक्षण हे असं शस्त्र आहे ज्याच्या मदतीने आपण सर्व काही बदलू शकतो, हा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा विचार सार्थ ठरवत, रावी येथील जिल

ग्रामिण विद्यार्थ्यांचा उच्च शैक्षणिक पाया रयतमुळे मजबूत : कोल्हे
मंथन परीक्षेत जवळे शाळेचा ठसा; ‘मिशन आरंभ’ परीक्षेतही यश ; तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत
रामेश्वरवाडी शाळेची जिल्हास्तरीय चमकदार कामगिरी; मंथन जनरल नॉलेज परीक्षेत विद्यार्थी ठरले अव्वल
विभागीय आयुक्तांच्या आदेशालाही नांदेड जि.प.ने झुगारले Nanded Marathi News | Nanded  ZP pronounced the order of divisional commissioner's order | Latest Nanded  News at Lokmat.com


मुक्रमाबाद : शिक्षण हे असं शस्त्र आहे ज्याच्या मदतीने आपण सर्व काही बदलू शकतो, हा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा विचार सार्थ ठरवत, रावी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा ’शाळा पूर्वतयारी मेळावा-1’ मोठ्या उत्साहात पार पडला.
आजच्या आधुनिक युगात शिक्षण ही चौथी मूलभूत गरज बनली आहे. याच उद्देशाने समाजात शिक्षणाविषयी प्रबोधन व्हावे आणि मुलांमध्ये शाळेची ओढ निर्माण व्हावी, यासाठी 29 एप्रिल 2026 रोजी या विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेत प्रवेशपात्र ठरलेल्या चिमुकल्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या मेळाव्यात मुलांचा शारीरिक, भावनिक आणि भाषिक विकास पडताळण्यासाठी विविध मनोरंजक कृती व उपक्रम राबवण्यात आले. विद्यार्थ्यांची वजन व उंची मोजून त्यांच्या आरोग्याची व विकासाची नोंद घेण्यात आली. शाळेच्या वातावरणाशी मुलांची गट्टी व्हावी, यासाठी उभारण्यात आलेल्या आकर्षक ’सेल्फी पॉईंट’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मेळाव्याला मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे गावात एक शैक्षणिक चळवळ निर्माण झाली असून, पहिल्याच दिवशी एकूण 11 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बिस्किटांचे वाटप करण्यात आले. या मेळाव्यासाठी गावातील शिक्षणप्रेमी नागरिक  भारतबाई पांचाळ,  जयश्री लक्ष्मण राठोड,  सरस्वती राम राठोड,  पिंका बालाजी चव्हाण,  ललिता आडे,  अनिता देवकत्ते यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका  प्रेमला येळगे,  अनिताताई गायकवाड,  जयश्री कोये यांनी अनमोल सहकार्य केले. शाळेचे मुख्याध्यापक मारमवार सर यांनी पहिलीच्या प्रवेशाबाबत समाधान व्यक्त केले. मेळाव्याच्या नियोजनासाठी गादगे मॅडम,  राठोड मॅडम,  शिंदीजवळगेकर मॅडम,  भद्रे मॅडम, भोसले सर, चापलवाड सर आणि राम कोये यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS