Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘शताब्दी दीपस्तंभ’ राज्यस्तरीय पुरस्काराने अमोलक संस्था सन्मानित;सरपंच परिषदेकडून राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

कडा : सरपंच परिषद, मुंबई (महाराष्ट्र) यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘राज्यस्तरीय शताब्दी दीपस्तंभ पुरस्कार’ यंदा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्य

धानोरा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एच एस सी परीक्षेत मारली बाजी
आष्टीत उजळला मानवतेचा दीप; साध्या विवाहातून चार दिव्यांग निराधारांना जीवनाचा आधार
पोहण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; आष्टी तालुक्यातील हृदयद्रावक घटना

कडा : सरपंच परिषद, मुंबई (महाराष्ट्र) यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘राज्यस्तरीय शताब्दी दीपस्तंभ पुरस्कार’ यंदा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ या संस्थेला जाहीर झाला आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या संस्थांचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान केला जातो.
परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिलेल्या पत्रानुसार,संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. शंभर वर्षांची परंपरा असलेली ही संस्था ग्रामीण भागातील सर्व घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. नैतिकता,प्रामाणिकपणा आणि श्रमसंस्कार यांवर आधारित शिक्षण देत संस्थेने अनेक यशस्वी विद्यार्थी घडवले आहेत, जे विविध क्षेत्रांत देश-विदेशात कार्यरत आहेत. संस्थेत बालवाडी पासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत विविध अभ्यासक्रम उपलब्ध असून, अभियांत्रिकी,फार्मसी,तसेच स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनाची सुविधा दिली जाते.दरवर्षी अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल होत आहेत. तसेच, 33 एकर परिसरात विकसित कॅम्पसमध्ये ‘अमोलक तीर्थंकर गार्डन’ सारखे उपक्रम राबवले जात असून,एनसीसी सारखे उपक्रमही स्वतःच्या खर्चाने चालवले जातात. भविष्यात मेडिकल कॉलेज,नर्सिंग कॉलेज, हॉस्पिटल व इतर सुविधा सुरू करण्याचा संस्थेचा मानस असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. हा पुरस्कार सोहळा गुरुवार,30 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता यशदा, पुणे येथे होणार आहे.प्रा.राम शिंदे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार असून, आमदार श्रीकांत भारतीय आणि आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार अध्यक्षस्थानी राहणार आहेत.या सन्मानाबद्दल संस्थेचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

COMMENTS