Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामिण विद्यार्थ्यांचा उच्च शैक्षणिक पाया रयतमुळे मजबूत : कोल्हे

कोपरगाव : “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उपेक्षितांच्या दारी शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. माजी मंत्री स्व. शंकरर

जायकासह महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्र बळकट करण्यासाठी नवे पाऊल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; जायकाकडून 3 हजार 708 कोटींची वित्तीय सहाय्यता
राज्यात आजपासून दोन दिवस पावसाची शक्यता
महात्मा गांधी विद्यालयाचे चौघे राज्यात प्रथम; बारावीतील नऊ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांहून अधिक गुण

कोपरगाव : “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उपेक्षितांच्या दारी शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे आणि स्व. शंकरराव काळे यांनी शिक्षण क्षेत्रात राजकीय मतभेद बाजूला ठेवत ही विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा पाया रयत शिक्षण संस्थेमुळेच भक्कम झाला आहे. त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या व्यवस्थापन मंडळ सदस्यांनी शिक्षण सशक्तीकरणाचे भान ठेवून काम करावे,” असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.
संजीवनी उद्योग समूह व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऍड. संदीप वर्पे आणि सुरेश बोळीज यांची रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळ सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल गुरुवारी सत्कार करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून बिपीन कोल्हे बोलत होते. प्रारंभी विवेक कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
बिपीन कोल्हे म्हणाले, “खेड्यापाड्यातील गरीब, वंचित, मागासवर्गीय, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘स्वावलंबी शिक्षण’ ही संकल्पना रुजविली. आज त्या कार्याचा विस्तार राज्यभर झाला आहे. बदलत्या स्पर्धेच्या काळात शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेत काळानुरूप बदल घडवून आणले आणि ग्रामीण भागातील शिक्षण अधिक सक्षम केले.”
“अहिल्यानगर जिल्ह्यासह इतर भागात रयत शिक्षण संस्थेचा विस्तार करण्यासाठी स्व. शंकरराव काळे आणि स्व. शंकरराव कोल्हे यांनी मोठे योगदान दिले. अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. स्पर्धा परीक्षांमधून राज्य व केंद्र शासनात रयतेचा विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे, या उद्देशाने त्यांनी सुसंगत धोरणे राबविली. त्याच विचारांचा वारसा नव्या सदस्यांनी पुढे न्यावा,” असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, संचालक विश्वास महाले, त्र्यंबकराव सरोदे, आप्पासाहेब दवंगे, निवृत्ती बनकर, बापूसाहेब बारहाते, ज्ञानदेव औताडे, मनिष गाडे, ज्ञानेश्वर होन, विलास वाबळे, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी बाळासाहेब वक्ते यांनी आभार मानले.

COMMENTS