म्हाडाच्या घरांना कोरोनाकाळातही उत्स्फुर्त प्रतिसाद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हाडाच्या घरांना कोरोनाकाळातही उत्स्फुर्त प्रतिसाद

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांच्या वतीने सर्वसामान्य लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यासह पिंपरी-चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल दोन हजार 908 घरांची सोडत काढण्यात आली.

डान्स करताना हृदयविकाराच्या झटक्याने व्यक्तीचा मृत्यू.
महाविकास आघाडी सरकार अल्पमतात : नारायण राणे | DAINIK LOKMNTHAN
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी नव वधु-वरास दिल्या शुभेच्छा

पुणे / प्रतिनिधी: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांच्या वतीने सर्वसामान्य लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यासह पिंपरी-चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल दोन हजार 908 घरांची सोडत काढण्यात आली. कोरोनाचे गंभीर संकट असतानादेखील म्हाडाच्या घरांना सर्व स्तरातील लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, तीन हजार घरांसाठी तब्बल 57 हजार लोकांनी अर्ज केला आहे. आता या घरांची सोडत जूनअखेरपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल दोन हजार 908 घरांची सोडत काढण्यात आली. कोरोना संकट असतानाही सहा महिन्यांत दोन वेळा आणि तेही तब्बल दोन हजारापेक्षा अधिक घरांची सोडत काढण्याचा नवा विक्रम पुणे म्हाडाने केला आहे. यात सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली या जिल्ह्यातील म्हाडाच्या दोन हजार 153 सदनिका व 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील प्राप्त झालेल्या 755 सदनिका अशा एकूण दोन हजार 908 सदनिकेच्या अंतिम नोंदणीसाठी 13 मेपर्यंत मुदत होती; पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव या जाहिरातील योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. या घरांसाठी अर्ज करण्यास 13 जूनपर्यंत मुदत होती. आता ही मुदत संपली असून सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता जून अखेरपर्यंत ही सोडत काढण्यात येणार असल्याचे माने यांनी येथे सांगितले.

COMMENTS