Homeताज्या बातम्या

गेवराईतील वाळू घोटाळा; तहसीलदारांसह प्रमुख सूत्रधारांवर गुन्हे दाखल कराएसआयटी चौकशीचीही मागणी; गेवराईतील सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

गेवराई तालुक्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, गोदावरी बचाव सर्व पक्षीय कृती समिती, यांनी जिल

गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित कराकत्तलखाने व मांस निर्यात बंदीच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
सरस्वती विद्यालय तेलगाव ची यशाची परंपरा कायम
मी म्हणेल तोच कायदा; तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाटील यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप


गेवराई तालुक्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, गोदावरी बचाव सर्व पक्षीय कृती समिती, यांनी जिल्हाधिकार्‍यांची गुरुवारी भेट घेत निवेदन सादर करत या प्रकरणातील प्रमुख आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, या निवेदनात तहसीलदार संदीप खोमणे यांना मुख्य आरोपी घोषित करून त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या महसूल घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गेवराई तालुक्यात परवाना नसताना मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन व वाहतूक करण्यात आली. या अवैध प्रकारामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला असून, संबंधित यंत्रणांनी वेळेवर कारवाई न केल्याने हा प्रकार अधिक बळावल्याचा आरोप गोदावरी बचाव सर्व पक्षीय कृती समितीने केला आहे. अवैध वाळू उत्खनन, वाहतूक आणि साठवणूक याबाबत वारंवार तक्रारी होऊनही संबंधित महसूल अधिकार्‍यांनी ठोस कारवाई केली नाही. उलट काही अधिकार्‍यांच्या संगनमतामुळेच हा घोटाळा वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे तहसीलदार संदीप खोमणे यांच्यावर मुख्य सूत्रधार म्हणून गुन्हा दाखल करा,तसेच चकलंबा पोलीस स्वतः यात हप्ता घेत असल्याने आणी त्याचा पोलीस कर्मचारी सध्या या गुन्हात आरोपी असल्यामुळे हा तपास चकलंबा पोलीस  कडून काढण्यात यावा आणी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी एसआयटी किंवा आर्थिक गुन्हे शाखा मार्फत तपास करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि वाळू माफिया यांच्यातील कथित आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.विना नंबर हायावा वाहतूर्कींसरास चालू आहे त्यामुळे आर टी ओ जिल्हा ट्राफिक शहर ट्राफिक च्या अधिकारी कर्मचारी वर कारवाई करण्यात यावी या सह  मोठ्या प्रमाणात महसूल बुडाल्याचा आरोप निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अवैध वाळू उत्खननामुळे शासनाच्या सुमारे 100 कोटी रुपयांहून अधिक महसुलाचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून नुकसानभरपाई वसूल करावी, अशीही मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,राष्ट्रवादी शरद पवार पक्ष,शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष,शिवसेना शिंदे गट, वंचीत बहुजन आघाडी,रिपाई गवई गट,डेमोकोर्टीक पार्टी ऑफ इंडिया,शेतकरी सघटना,छावा संघटना, प्रहार संघटना,पँथर संघ यांच्या गोदावरी बचाव च्या वतीने करण्यात आली आहे. त्याचबरोबर अवैध वाळू वाहतुकीदरम्यान घडलेल्या अपघातांमुळे काही निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याचा मुद्दाही समितीने उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ महसूल घोटाळा म्हणून न पाहता, सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित गंभीर विषय म्हणून तपास करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूल मंत्री, विभागीय आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठविण्यात आल्या असून, लवकरात लवकर कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही गोदावरी बचाव सर्व पक्षीय कृती समितीने दिला आहे. गेवराईतील कथित वाळू घोटाळ्याबाबत यापूर्वीही अनेक आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. आता सर्व पक्षीय कृती समितीने थेट जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन देत गंभीर आरोप केल्यामुळे प्रशासन कोणती भूमिका घेते आणि चौकशीची दिशा काय ठरते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS