Homeताज्या बातम्याअहमदनगर

जिवाणू खते व माती,पाणी परीक्षण मूळे शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल – ना.गडाख

नेवासाफाटा ; प्रतिनिधीनवीन शेतीला जीवाणू खते व पाणी,माती परीक्षण करून शेती केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळून उत्पन्नात आमूलाग्र बदल घडवून क्रांती घडेल,असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

शेतकर्यांसाठी कृषि विद्यापीठ, कृषि विभाग व महाबीज यांनी एकत्र येवून काम करावे- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील
साखर सम्राटांपुढे निलेश लंकेंचे लोकसभेला आवाहन l Nilesh lanke l LokNews24
कोकणवासियांसाठी धावणार ’मोदी’ एक्सप्रेस l DAINIK LOKMNTHAN

नेवासाफाटा ; प्रतिनिधी
नवीन शेतीला जीवाणू खते व पाणी,माती परीक्षण करून शेती केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळून उत्पन्नात आमूलाग्र बदल घडवून क्रांती घडेल,असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

      ना.गडाख हे पाढरीपुल येथील एम.आय.डी. सी.A-३१ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या क्रॉप ड्रीप ऍग्रो सायन्सेस  उत्पादन कंपनीच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी उद्योजक बापूसाहेब नजन, प्रा.नाथा भाऊ पंडित,दिलीप लोखंडे,कारभारी जावळे, अशोक मिसाळ, मुळा कारखान्याचे संचालक काका डफाळ, तुकाराम मिसाळ, प्रा.गणपतराव चव्हाण,दगडू इखे, सोपान शिकारे,किशोर भुसारी,शशिकांत मतकर, खंडागळे गुरुजी,पंकज लाभाते, एकनाथ धानापूणे, ह.भ.प.आडभाई महाराज,प्राचार्य डॉ. शंकर लाव्हरे, यांच्यासह परिसरातील शेतकरी, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

   ना.गडाख म्हणाले,ग्रामीण भागातील तरुणांनी परदेशातील नौकरी सोडून जीवाणु खताची निर्मिती करून शेती क्षेत्राला कमी खर्चात शेतीची सुपीकता टिकवण्यासाठी जीवाणु खते व पाणी,माती,परीक्षण करण्याचे तंत्रज्ञान याने शेतीचा पोत सुधारेल हे व्यवसायिक ज्ञान विखे तरुणांनी घेतले ही एक अभिमानाची बाब आहे,जेष्ठ साहित्यीक यशवंतराव गडाख यांच्या विचारांचा पायंडा हा तरुणांनी नौकरीच्या माघे न लागता रोजगार निर्मिती व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय योगेश विखे,व किशोर विखे यांनी एक धाडसाचे पाऊल टाकल्याने त्यांचे कौतुक करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन ना.गडाख यांनी दिले.

  उद्योजक बापूसाहेब नजन म्हणाले, यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी,उत्पादन जास्त,ऊस, कापूस,डाळिंब, द्राक्षे, केळी, मोसंबी, कांदा, आदी पिकासाठी उपयुक्त ठरेल,व उत्पन्नात वाढ होईल.या प्रसंगी प्रा.गणपतराव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले प्रमुख पाहुण्यांचा सन्मान शंकर विखे व अण्णासाहेब विखे यांनी केला.प्रस्ताविक,आभार प्रा.आप्पासाहेब विखे यांनी मानले.

COMMENTS