Homeताज्या बातम्या

कर्जतमध्ये २७ वा कारगिल विजय दिन उत्साहात साजरा; माजी सैनिकांचा सन्मान आणि वृक्षारोपण

कर्जत: जय जवान आजी-माजी सैनिक सेवा फाउंडेशन, कर्जत आणि सर्व सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने २७ वा कारगिल विजय दिवस कर्जत शहरात अत्यंत देशभक

अॅमेझॉनला महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्र्यू जॅसी यांना आवाहन
रस्त्यावरील कथित अतिक्रमण प्रकरण पुन्हा चर्चेत; जिल्हा परिषदेकडून चौकशीचे आदेश
आसाममधील पूरपरिस्थिती गंभीर; मृतांची संख्या ४४ वर, साडेसहा लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे बाधित

कर्जत: जय जवान आजी-माजी सैनिक सेवा फाउंडेशन, कर्जत आणि सर्व सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने २७ वा कारगिल विजय दिवस कर्जत शहरात अत्यंत देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कारगिल युद्धातील हुतात्म्यांना अभिवादन, भव्य तिरंगा रॅली, आजी-माजी सैनिकांचा सन्मान आणि वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा स्मारकावर कारगिल युद्धातील शहीदांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर हुतात्मा स्मारक ते कारगिल शहीद स्मृती उद्यान अशी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. कारगिल शहीद स्मृती उद्यानात रॅलीचा समारोप झाला. येथे सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने आजी-माजी सैनिकांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच कारगिलच्या शहीदांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपणही करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष छाया शेलार यांनी भारतीय सैनिकांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व अधोरेखित करत सैनिकांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. जय जवान आजी-माजी सैनिक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष मेजर भाऊसाहेब रानमाळ यांनी कारगिल युद्धातील थरारक अनुभव कथन करत भारतीय सैन्याच्या अदम्य शौर्याची माहिती दिली. रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष अनिल तोरडमल यांनीही कारगिल विजय दिनाचे महत्त्व विशद करत सैनिकांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या प्रसंगी प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, विनोद दळवी, सुनील शेलार, वैभव शहा, सकल मराठा समाजाचे समन्वयक रावसाहेब धांडे, रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे पदाधिकारी, आजी-माजी सैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विशाल मेहेत्रे यांनी केले, तर आभार नानासाहेब गाढवे यांनी मानले.

COMMENTS