Homeताज्या बातम्याअहमदनगर

चिमुरड्यासह विवाहितेचा विहिरीत मृतदेहजामखेडमधील घटना; पोलिसांकडून तपास सुरू

जामखेड : जामखेड तालुक्यातील तरडगाव येथे २३ वर्षीय विवाहितेसह तिच्या दिड वर्षीय मुलाचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. य

शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा आज रास्तारोको
शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवावाआ. मोनिका राजळे ; खरवंडी कासार येथे ‘महाराजस्व’ शिबीर उत्साहात
कॅफेच्या नावाखाली सुरू होते अश्लील चाळेकर्जत पोलिसांची कारवाई, दोन जोडपी ताब्यात

जामखेड : जामखेड तालुक्यातील तरडगाव येथे २३ वर्षीय विवाहितेसह तिच्या दिड वर्षीय मुलाचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे खर्डा, तरडगाव, वंजारवाडीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मृतांमध्ये साळु शिवाजी चौरे (वय २३) व तिचा मुलगा विवांश शिवाजी चौरे (वय दिड वर्षे) यांचा समावेश आहे. तरडगाव येथील दत्तुबा ढाळे यांच्या शेतातील विहिरीत रविवारी (दि. ११) सकाळी ग्रामस्थांना काहीतरी तरंगताना दिसले. त्यानंतर ग्रामस्थांनी बाज लावून मोठ्या प्रयत्नाने दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले.दोघांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे आणण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. आईच्या कुशीत वाढणाऱ्या चिमुकल्याचाही या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.याबाबत वंजारवाडी येथील बिभिषण तांदळे (वय ५९) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, त्यांची पुतणी साळु चौरे व नातू विवांश हे १० मेपासून बेपत्ता होते. नातेवाईकांकडून त्यांचा सर्वत्र शोध सुरू होता. दरम्यान, ११ मे रोजी सकाळी तरडगाव येथील विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आले.घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सहाय्यक फौजदार सय्यद यांनी पंचनामा केला आहे. पुढील तपास खर्डा पोलीस करीत आहेत. घटनेमागील कारण अस्पष्टया घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. विवाहितेने मुलाला घेऊन विहिरीत उडी मारली का, अथवा यामागे अन्य काही कारण आहे का, याबाबत परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

COMMENTS