Homeताज्या बातम्या

संत सावता महाराजांनी कर्मालाच दिले ईश्वरसेवेचे रूप : माजी आ. काळे

कोपरगाव - शेतीच्या कष्टमय जीवनातही विठ्ठलभक्तीचा ध्यास कायम ठेवत संत सावता महाराजांनी श्रम, निष्ठा आणि भक्तीचा अनोखा संगम घडवून आणला. कष्टाला भक्

स्व.अजितदादा पवार यांच्या बीडमधील पहिल्या पूर्णाकृती पुतळा उभारणीला वेग परळीत होणार स्मारक; जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय आढावा बैठक
‘महाराष्ट्र शासन’ अन् ‘सेंट्रल गव्हर्नमेंट’च्या पाट्या लावलेल्या वाहनांची नांदेडमध्ये वाढ; गैरवापराची चौकशी होणार का?
मल्लिकार्जुन खरगेंची अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी; मोदींवरही हल्लाबोल

कोपरगाव – शेतीच्या कष्टमय जीवनातही विठ्ठलभक्तीचा ध्यास कायम ठेवत संत सावता महाराजांनी श्रम, निष्ठा आणि भक्तीचा अनोखा संगम घडवून आणला. कष्टाला भक्तीची जोड देत संत सावता महाराजांनी कर्मालाच ईश्वरसेवेचे रूप दिले, असा प्रेरणादायी संदेश त्यांच्या जीवनकार्यातून आजही समाजाला मिळतो असे प्रतिपादन माजी आमदार अशोकराव काळे यांनी केले.

वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोपरगाव शहरातील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात माजी आमदार अशोकराव काळे यांनी संत शिरोमणी सावता महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, संत शिरोमणी सावता महाराजांनी आपल्या आचरणातून कष्ट, भक्ती आणि प्रामाणिक कर्म यांचा सुंदर संगम समाजासमोर ठेवला आहे. शेतात राबतांना मुखी विठ्ठलाचे नामस्मरण आणि मनात अखंड ईश्वरभक्ती ठेवून त्यांनी कर्मालाच परमेश्वराची सेवा मानली.

“कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी” या अभंगातून त्यांनी दैनंदिन कष्टातही विठ्ठलाचे दर्शन घडवत श्रमाला प्रतिष्ठा देत कोणतेही काम लहान-मोठे नसते, हा महान संदेश समाजाला दिला.

यावेळी माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, रवीकाका बोरावके, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, माजी नगरसेवक विरेन बोरावके, सौ. कांचनताई बोरावके, सौ. अरुणाताई ताम्हाणे, तुषार ससाणे, प्रदीप नवले, प्रकाश रासकर, बापूसाहेब इनामके, विशाल राऊत आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

COMMENTS