Homeताज्या बातम्या

सर्वोदय विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप; विजय पवार यांच्याकडून १२ गरजू विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च

अकोले - तालुक्यातील राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेचे ना. वि. देशमुख सर्वोदय विद्या मंदिर, कातळापूर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्

सद्गुरू गोदड महाराज रथ यात्रा उत्साहात; दोन लाखांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन
बालमटाकळीत 950 मीटर लांबीच्या बंधाऱ्याची कामे पूर्ण
शिवसेनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

अकोले – तालुक्यातील राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेचे ना. वि. देशमुख सर्वोदय विद्या मंदिर, कातळापूर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. गेल्या १७ वर्षांपासून मुंबई येथील बांधकाम व्यावसायिक विजय शिवराम पवार हे या विद्यालयातील १२ गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या वर्षभराचा संपूर्ण शैक्षणिक खर्च स्वखर्चाने उचलत आहेत. त्यांच्या या मोलाच्या योगदानामुळे आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मोठी मदत झाली आहे. यावर्षी दत्तक घेतलेल्या १२ विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, वह्या, कंपास, रंगपेटी, परीक्षा फी व सहलीचा खर्च देण्यात आला. तसेच इतर २५ गरजू विद्यार्थ्यांना गणवेश, उर्वरित गरजू विद्यार्थ्यांना वह्या आणि सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना विजय पवार यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, प्रामाणिकपणे मेहनत करण्याची गरज आणि जीवनात येणाऱ्या संधींचा योग्य उपयोग करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. या कार्यक्रमास सत्यनिकेतन संस्थेचे सचिव एम. एल. मुठे, ज्येष्ठ संचालक व्ही. डी. पवार, शाळा समिती अध्यक्ष रामजी काठे, संस्थेचे शिक्षण निरीक्षक लहानू पर्बत, सरपंच बाळासाहेब ढगे, प्राचार्य भाऊसाहेब बनकर, मधुकर मोखरे, पर्यवेक्षक संजय व्यवहारे, आशा पवार, शर्वरी कांबळे, अक्षय पवार व वसतिगृह अधीक्षक पांडुरंग मुठे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जी. बी. मालुंजकर यांनी केले, तर सूत्रसंचालन अनिल पवार सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विटकर बी. एन., बेणके के. एस., गाडे, गभाले व धनंजय मोहंडुळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS