निघोज - राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या समर्थनार्थ पिंपळनेर येथे ग्रामस्थ व ज्येष्ठ वारकरी मं

निघोज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या समर्थनार्थ पिंपळनेर येथे ग्रामस्थ व ज्येष्ठ वारकरी मंडळींच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. पिंपळनेर येथील ग्रामस्थांनी सांगितले की, अशोक सावंत यांनी राजकीय ताकद वाढविण्यासोबतच वारकरी संप्रदायाच्या विकासासाठी तसेच परिसरातील विविध विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. मात्र, बाभुळवाडे येथे उनका चुकीच्या पद्धतीने अवमान करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या घटनेच्या निषेधार्थ तसेच सावंत यांच्या समर्थनार्थ हा दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी माजी सरपंच भाऊसाहेब लटांबळे, गोरख पाटील गाजरे, आर. बी. रासकर, सुरेश होले, हनुमंत रासकर, बाळासाहेब गाडे, ह. भ. प. भारत हजारे, माजी चेअरमन लक्ष्मण रासकर, संजय सालके, गोकूळ रासकर, ह. भ. प. गहिनाथ लोंढे, बाळासाहेब सावंत, उत्तम जेक्टे, पप्पू लटांबळे, माजी सरपंच सुनील कळसकर, अमोल जेक्टे, गोरख जेक्टे, विकी गाजरे, गोरक्ष सावंत, कुंदन रासकर, शशी पोटे, आकाश चव्हाण, संदीप गाजरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS