Homeताज्या बातम्याअहमदनगर

राहुरीत बनावट डॉक्टर; गुन्हा दाखल 

देवळाली प्रवरा : राहुरी येथील ‘गॅलक्सी निसर्ग उपचार केंद्र’ या क्लिनिकमध्ये कोणतीही अधिकृत वैद्यकीय नोंदणी नसताना रुग्णांवर उपचार केल्याप्रकरणी ड

मिरजगाव परिसरात मृतदेह आढळला
 चाकू हल्ल्यात तरुण गंभीर जखमी
अल्पवयीन मुलास मारहाण  

देवळाली प्रवरा : राहुरी येथील ‘गॅलक्सी निसर्ग उपचार केंद्र’ या क्लिनिकमध्ये कोणतीही अधिकृत वैद्यकीय नोंदणी नसताना रुग्णांवर उपचार केल्याप्रकरणी डॉ. तन्वीर देशमुख यांच्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन तसेच नॅशनल कौन्सिलकडे कोणतेही वैध नोंदणी प्रमाणपत्र नसताना तन्वीर देशमुख यांनी स्वतःला डॉक्टर म्हणून सादर करून रुग्णांची तपासणी व उपचार केल्याचे उघड झाले आहे. मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्टनुसार उपचार करण्याचा अधिकार नसतानाही विविध चिकित्सा पद्धतींचा वापर करून औषधोपचार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.तसेच ‘डॉक्टर’ या शब्दाचा गैरवापर केल्याबरोबरच बनावट पदवीची कागदपत्रे तयार करून सादर केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी राहुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश मिसाळ यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी वैद्यकीय उपचार घेताना डॉक्टरांची अधिकृत नोंदणी व पात्रता तपासून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

COMMENTS