Homeमहाराष्ट्रअहमदनगर

डाऊच बुद्रुकमध्ये महिला सक्षमीकरण शिबीर उत्साहात 

कोपरगाव शहर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत डाऊच बुद्रुक येथील महिला सक्षमीकरण अंतर्गत ग्रामसंघ व महिला बचत गटातील सर्व महिलांना स्वयं रोजगार व व्यवसायासाठी येथील राष्ट्रीयकृत बँक ऑफ इंडिया चे बँक मॅनेजर विशाल जाधव यांनी महिला बचत गटांसंबंधी विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. ग्रामीण भागातील महिला स्वतः च्या पायावर आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम बनल्या पाहिजे. त्यांनी स्वतः च्या आर्थिक विकासासोबत आपल्या कुटुंबाचा आणि पर्यायाने आपल्यागांवाचा सर्वांगीण विकासासाठी हातभार लावावा. यासाठी बँक वयक्तिक व  सामूहिक व्यवसायासाठी अत्यल्प व्याज दराने कर्ज पुरवठा करीत असलेबाबत महिला बचत गटातील सदस्यांना अमूल्य मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बँक ऑफ इंडिया च्या सीएसआर फंड निधीमधून गांवातील जिल्हा परिषद शाळेला शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ मशीन, कलर प्रिंटर व इतर शैक्षणिक भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी विजयसिंह पाटील यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन जि.प.शिक्षक व्ही.व्ही.गिरी यांनी केले. या प्रसंगी गांवचे सरपंच दिनेश गायकवाड, उपसरपंचपती संजय ढमाले, जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य भिवराव दहे, मुख्याध्यापक राजेंद्र पोटे, कावेरी गुंजाळ आदींसह ग्रामस्थ, महिला बचत गटातील सर्व सदस्य शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

सडे गाव ते सडे फाटा रस्ता डांबरीकरण पूर्ण
दीपक सोनवणे गोळाफेकमध्ये जिल्ह्यात प्रथम
Ahmednagar : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ Kopargaon शहरात सायकल रैली

कोपरगाव शहर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत डाऊच बुद्रुक येथील महिला सक्षमीकरण अंतर्गत ग्रामसंघ व महिला बचत गटातील सर्व महिलांना स्वयं रोजगार व व्यवसायासाठी येथील राष्ट्रीयकृत बँक ऑफ इंडिया चे बँक मॅनेजर विशाल जाधव यांनी महिला बचत गटांसंबंधी विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.

ग्रामीण भागातील महिला स्वतः च्या पायावर आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम बनल्या पाहिजे. त्यांनी स्वतः च्या आर्थिक विकासासोबत आपल्या कुटुंबाचा आणि पर्यायाने आपल्यागांवाचा सर्वांगीण विकासासाठी हातभार लावावा. यासाठी बँक वयक्तिक व  सामूहिक व्यवसायासाठी अत्यल्प व्याज दराने कर्ज पुरवठा करीत असलेबाबत महिला बचत गटातील सदस्यांना अमूल्य मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बँक ऑफ इंडिया च्या सीएसआर फंड निधीमधून गांवातील जिल्हा परिषद शाळेला शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ मशीन, कलर प्रिंटर व इतर शैक्षणिक भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी विजयसिंह पाटील यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन जि.प.शिक्षक व्ही.व्ही.गिरी यांनी केले. या प्रसंगी गांवचे सरपंच दिनेश गायकवाड, उपसरपंचपती संजय ढमाले, जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य भिवराव दहे, मुख्याध्यापक राजेंद्र पोटे, कावेरी गुंजाळ आदींसह ग्रामस्थ, महिला बचत गटातील सर्व सदस्य शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS