अहिल्यानगर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आठवड (ता. जि. अहिल्यानगर) येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ तसेच इयत्ता पहिलीत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम मंगळवार (दि. २१ एप्रिल २०२६) रोजी उत्साहात पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक एस. एस. गायकवाड उपस्थित राहणार असून ते विद्यार्थ्यांना वाहतूक व सुरक्षेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नेवासा तालुक्यातील आदर्श शिक्षक अभिषेक अर्जुन घटमाळ हेही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना, पालकांना व ग्रामस्थांना शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमात शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार असून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागतही करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल उत्साह निर्माण होण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमासाठी आठवड ग्रामपंचायतीच्या सरपंच सविता लगड, उपसरपंच शंकरराव मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासाहेब गाडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दिपक लगड यांनी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रप्रमुख कचरे, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच गावातील मान्यवरांचे सहकार्य लाभले आहे. मुख्याध्यापक संदिप वाघमारे, शिक्षक गोरख वाबळे, अजय भद्रे, साठे, अंगणवाडी सेविका व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या तयारीसाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.
अहिल्यानगर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आठवड (ता. जि. अहिल्यानगर) येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ तसेच इयत्ता पहिलीत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम मंगळवार (दि. २१ एप्रिल २०२६) रोजी उत्साहात पार पडणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक एस. एस. गायकवाड उपस्थित राहणार असून ते विद्यार्थ्यांना वाहतूक व सुरक्षेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नेवासा तालुक्यातील आदर्श शिक्षक अभिषेक अर्जुन घटमाळ हेही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना, पालकांना व ग्रामस्थांना शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमात शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार असून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागतही करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल उत्साह निर्माण होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमासाठी आठवड ग्रामपंचायतीच्या सरपंच सविता लगड, उपसरपंच शंकरराव मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासाहेब गाडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दिपक लगड यांनी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रप्रमुख कचरे, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच गावातील मान्यवरांचे सहकार्य लाभले आहे. मुख्याध्यापक संदिप वाघमारे, शिक्षक गोरख वाबळे, अजय भद्रे, साठे, अंगणवाडी सेविका व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या तयारीसाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.

COMMENTS