कोपरगाव: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इ. १० वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून यात संजीवनी ग्



कोपरगाव: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इ. १० वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून यात संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्यु. कॉलेजच्या कॅडेट साई विष्णू बोळीज याने ९४ टक्के गुण मिळवून आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन घडवत व संजीवनी सैनिकी स्कूलच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब करत प्रथम क्रमांक पटकावला.
शैक्षणिक गुणवत्ता, सैनिकी शिस्त आणि सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने यंदाही नेत्रदीपक यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत कॅडेट वेदांत संदीप खेतमाळीस याने ९२ टक्के गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर मोहर उमटवली तर कॅडेट पार्थ प्रशांत तळेकर हा ९१ टक्के गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. यंदाच्या परीक्षेसाठी शाळेचे एकूण ४५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यांपैकी तब्बल ३५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत संस्थेच्या गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सुमित कोल्हे (विश्वस्त) यांचे मत: “संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाबरोबरच शालेय शिक्षण, व्यक्तिमत्व विकास, नेतृत्वगुण आणि पूरक उपक्रमांनाही तितकेच महत्त्व दिले जाते. त्यामुळेच दरवर्षी संस्थेच्या यशाचा आलेख सातत्याने उंचावत आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेमध्ये ज्युनिअर कॉलेजची सुविधा उपलब्ध असून येथे एनडीए (NDA), सैनिक पूर्वभरती तसेच सैन्य दलातील विविध शाखांसाठी आवश्यक प्रशिक्षण उच्च शिक्षणाच्या तयारी सोबतच दिले जाते. स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांच्या स्वप्नातील आदर्श अधिकारी आणि आदर्श नागरिक घडविण्याचे कार्य आम्ही सातत्याने करत राहू.”

COMMENTS