Homeताज्या बातम्याअहमदनगर

संवत्सर पुलाच्या दुरुस्तीला गती द्यापावसाळ्यापूर्वी वाहतूक सुरू करा ; आ. काळे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

कोपरगाव : कोपरगाव मतदारसंघातील जुना मुंबई-नागपूर महामार्ग (एन.एच. ७५२ आय) वरील संवत्सर येथील गोदावरी नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळा तोंडावर आला असताना पुलावरील खड्डे बुजविण्याचे व दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करून वाहतूक तातडीने सुरू करावी, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.राज्यातील प्रमुख शहरांना जोडणारा हा महामार्ग दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र संवत्सर येथील गोदावरी नदीवरील पुलाच्या मध्यभागी भगदाड पडल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.गेल्या काही महिन्यांपासून हा मार्ग बंद असल्यामुळे परिसरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून अनेकांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत. तसेच कोपरगाव शहराशी संपर्क तुटल्याने पूर्व भागातील शेतकऱ्यांनाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.दरम्यान, आमदार आशुतोष काळे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुलाच्या दुरुस्तीसाठी विशेष निधीची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेत निधी उपलब्ध करून देण्यात आला असून पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र कामाचा वेग अत्यंत मंद असल्याची बाब समोर येत आहे.पावसाळा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना काम वेळेत पूर्ण होईल का, याबाबत वाहन चालक व नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.  याशिवाय महामार्गालगत पावसाचे पाणी वाहून नेणारे अनेक नैसर्गिक स्त्रोत बंद झाल्याने पावसाळ्यात पाणी साचून रस्त्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे नैसर्गिक प्रवाह मोकळे करून पाण्याचा निचरा सुरळीत करण्याच्या सूचनाही आ. काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कार्यकर्त्यांना जीव लावणारे नेतृत्व हरपले : आ. काळे
गोदावरी उजव्या-डाव्या कालव्यांचे काम प्रगतीपथावर – आ. आशुतोष काळे
पुणतांब्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे भूमिपूजनघाट संवर्धनासाठी साडेतीन कोटींचा प्रस्ताव; इतिहास जतनाला चालना

COMMENTS