कुंडलवाडी : उसने दिलेल्या पैशांची परतफेड करण्यासाठी वारंवार तगादा लावल्यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावाला कंटाळून एका व्यक्तीने विषारी औषध प्

कुंडलवाडी : उसने दिलेल्या पैशांची परतफेड करण्यासाठी वारंवार तगादा लावल्यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावाला कंटाळून एका व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून एका महिलेविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील दस्तगीर गल्लीत राहणारे शेख युसुफसाब महबूवसाब(वय 57) यांनी परिसरातील इंद्रावाई सयाराम गोणेलवार यांच्याकडून काही रक्कम उसने घेतली होती. संबंधित महिलेने त्या रकमेच्या परतफेडीसाठी वारंवार तगादा लावल्याने शेख युसुफसाब यांना मानसिक त्रास होत होता. या मानसिक तणावाला कंटाळून त्यांनी 25 एप्रिल रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी शेख वसीमा शेख युसुफ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरी करत आहेत.

COMMENTS