Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरक्षण हा आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न : शशिकांत तरंगे

लोणंद : राजमाता अहिल्यादेवी देवी जयंती कार्यक्रमात बोलताना शशिकांत तरंगे व उपस्थित मान्यवर. (छाया : सुशिल गायकवाड) लोणंद / प्रतिनिधी : देशामध्ये अ

शिवंम प्रतिष्ठानतर्फे डॉ. सुरेश भोसले यांचा कोव्हीड योध्दा आरोग्य पुरस्काराने सन्मान
डंपर-दुचाकी अपघातात युवतीचा मृत्यू
शेती क्षेत्रामध्ये आधुनिकता आणली पाहिजे : खा. शरद पवार

लोणंद / प्रतिनिधी : देशामध्ये अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळाले. परंतू तुमच्या आमच्या पर्यंत या देशाला 75 वर्ष स्वातंत्र्य मिळाले. परंतू माझ्या गावगाड्यातील धनगराच्या वाडी-वस्तीपर्यंत स्वातंत्र्य मिळाले का? याचे चिंतन खर्‍याअर्थाने तुम्हा आम्हाला करायची गरज आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय हेच अजून धनगर समाजातल्या वाडी-वस्तीवर काम करणार्‍या माझ्या सामान्य माणसाला अजून कळालेले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना या सगळ्या गोष्टींमध्ये त्याठिकाणी तुमच्या आमच्यासाठी जे संविधान लिहिले त्याचा अभ्यास आपण केला नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोक्यामध्ये घेतले नाही. आपण येणार्‍या काळामध्ये जर आपली प्रगती करायची असेल तर अहिल्यादेवी यांना जसे आपण आदर्श मानतो. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जोपर्यंत आपण आपल्या डोक्यामध्ये घेणार नाही. तोपर्यंत धनगर समाजाचे रडगाणे संपणार नाही. असे धनगर ऐक्य परिषदेचे अध्यक्ष शशिकांत तरंगे यांनी म्हटले आहे.
लोणंद, ता. खंडाळा येथे राजमाता प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक व सातारा जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील उपस्थित होते. तसेच प्रमुख व्याख्याते म्हणून महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मणराव हाके उपस्थित होते.
तरंगे पुढे म्हणाले, तुम्हाला संविधान कळले पाहिजे. आपले प्रश्‍न गेली अनेक वर्षांपासून देशामध्ये राज्यामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री होतात. विधिमंडळात जातात त्या विधिमंडळामध्ये, आपली संख्या अफाट असूनही आपण आपली माणसं विधिमंडळात पाठवू शकलो नाही. म्हणून आपल्याला आपल्या समस्यांसाठी अनेकांच्या दारामध्ये जाऊन आपल्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळा निवडणूका जवळ आल्या की, आरक्षणासाठी भीक मागावी लागते.
आपल्या समाजामध्ये आरक्षणाचा विषय काढला की, आपलीच लोकं म्हणतात तेवढं सोडून बोला ते काही होत नसते. एवढ्या नैराश्यामध्ये समाज गेला. आपला हा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. त्यासाठी आपण काय केलं? असा सवाल ही शशिकांत तरंगे यांनी उपस्थित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की, तुम्हाला जर तुमच्या समाजाचा उध्दार करायचा असेल, तुम्हाला तुमच्या समाजाचे प्रश्‍न सोडवायचे असतील. तुम्हाला तुमच्या उद्याच्या पिढ्यांचे भवितव्य घडवायचे असेल तर तुमचे प्रतिनिधी हे विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये गेले पाहिजेत. म्हणून तुम्ही राजकारण केले पाहिजे. जो समाज राजकारणापासून वंचित आहे तो समाज सातत्याने भीक मागतो, असेही शशिकांत तरंगे यांनी म्हटले आहे.

COMMENTS