Homeताज्या बातम्या

वक्फ सेवा इनाम जमिनीवरील अनधिकृत पत्र्याचे शेड हटविण्याची मागणीकलीम अहमद शेख यांचे प्रशासनाला निवेदन

शहरातील तेलगाव रोड परिसरातील सर्व्हे क्र. 115 ही वक्फ सेवा इनाम जमीन असल्याचा दावा करत, या जमिनीवर उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड तात्काळ थांबवून

अजिमोद्दिन शेख यांना पद्मपाणि राज्यस्तरीय उत्कृष्ट सामाजिक कार्य 2026 पुरस्कार
भारतीय संस्कृतीचा वारसा जपत ‘सत्य वृक्ष पूजन’ उपक्रम100 औषधी वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
आरटीई प्रवेशासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ; बोगस कागदपत्रांवर कारवाईची मागणी



शहरातील तेलगाव रोड परिसरातील सर्व्हे क्र. 115 ही वक्फ सेवा इनाम जमीन असल्याचा दावा करत, या जमिनीवर उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड तात्काळ थांबवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कलीम अहमद शेख यांनी प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत कलीम अहमद शेख यांनी जिल्हा वक्फ अधिकारी, बीड, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड येथे स्वतंत्र निवेदने सादर केली आहेत. निवेदनात नमूद केल्यानुसार, तेलगाव रोड येथील सर्व्हे क्र. 115 ही वक्फ सेवा इनाम जमीन असून कलीम अहमद शेख व शेख हमीद पाशा मिया हे सदर जमिनीचे वारस असल्याचे सांगण्यात आले आहे. या जमिनीवर शेख शाहेद यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता पत्र्याचे शेड उभारल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर अनधिकृत बांधकाम तातडीने थांबवून संबंधित शेडबाबत कायद्यानुसार कारवाई करावी, तसेच वक्फ जमिनीचे संरक्षण करून भविष्यात कोणतेही अनधिकृत बांधकाम होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीकडे बांधकामाबाबत विचारणा केली असता शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोपही कलीम अहमद शेख यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करत पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून वक्फ सेवा इनाम जमिनीचे संरक्षण करावे, गरज भासल्यास पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा आणि अनधिकृत पत्र्याच्या शेडबाबत नियमानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी कलीम अहमद शेख यांनी प्रशासनाकडे केली आहे.

COMMENTS