Homeताज्या बातम्याबीड

अंबाजोगाईत एस.एफ.आयकडून जलकुंड स्वच्छता मोहीम राबवली

दि. 26 एप्रिल 2026 - एस.एफ.आय (डऋख) अंबाजोगाई तालुका समितीच्या वतीने कवी दासोपंत यांच्या समाधी परिसरातील नरसिंह मंदिराजवळील जलकुंडाची स्वच्छता मो

महावितरणमधील खांदेपालटगेवराईचे उपविभागीय अभियंता शाम मोरे यांची बदली
आष्टी बसस्थानक की डुकरांचे नंदनवन?8 वर्षांचा वनवास संपणार तरी कधी?
मिल्लीया महाविद्यालयात सेवा हक्क दिन उत्साहात साजरा



दि. 26 एप्रिल 2026 – एस.एफ.आय (डऋख) अंबाजोगाई तालुका समितीच्या वतीने कवी दासोपंत यांच्या समाधी परिसरातील नरसिंह मंदिराजवळील जलकुंडाची स्वच्छता मोहीम आज उत्साहात राबविण्यात आली. सदर परिसरात दारुड्यांचा वाढलेला वावर, जलकुंडात विसर्जित केलेल्या मूर्तींचे अवशेष तसेच नगर परिषदेचे झालेल्या दुर्लक्षामुळे परिसर अस्वच्छ झाला होता. यामुळे पर्यटक तसेच महिलांसाठी हा परिसर अयोग्य बनत चालला होता. या पार्श्वभूमीवर एस.एफ.आयने पुढाकार घेत स्वच्छता मोहीम हाती घेतली.
या वेळी तालुका समितीने भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला. या मोहिमेत विविध महाविद्यालये व शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच डी.वाय.एफ.आय (ऊधऋख) चे सुहास चंदनशिव, प्रशांत मस्के, अजिंक्य सरवदे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप चव्हाण उपस्थित होते. एस.एफ.आय अंबाजोगाई तालुका अध्यक्ष हमीद रुकसाना मुनवर, सचिव प्रथमेश मीरा जगन्नाथ, उपाध्यक्ष पायल कोळी, स. म. सदस्य तेजस सरवदे तसेच तालुका समिती सदस्य सारंग सुनिता अशोक, विशाल राठोड, प्रमोद नागरगोजे, सुरज व्हावळे, कावेरी मुंडे, गीता घुमरे, उमंग बुरांडे, हर्षा चव्हाण, कृष्णा मस्के, संध्या चौधरी, प्रज्ञा खोसे, आसाराम सानप, आविष्कार गीता बळीराम, मंगेश नागरगोजे व इतर कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

COMMENTS