Homeताज्या बातम्या

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका मनसे ताकतीनिशी लढणार: अविनाश पालवे

पाथर्डी : पाथर्डी तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव, कर्जत व जामखेड तालुक्यांमध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका महाराष्ट्र

विदर्भात उद्यानविद्या महाविद्यालयाला मंजुरी; पुण्यात एनडीआरएफला कायमस्वरूपी जागा, १७७ तालुक्यांना विशेष निधी
ज्येष्ठांसाठी १५ कलमी ’हक्क चार्टर’ लागू करा; डॉ. हंसराज वैद्य यांची केंद्र व राज्य शासनाकडे आग्रही मागणी
कार्यकर्ते उपेक्षित, वारसदार पुढे? भाजपमध्ये खदखद; खा. गोपछडेंच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! राज्यातील काही ठिकाणच्या निवडणुका पुढे  ढकलल्या; कारण काय? Maharashtra Marathi News | Big decision of the Election  Commission! Elections postponed in ...

पाथर्डी : पाथर्डी तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव, कर्जत व जामखेड तालुक्यांमध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने व संपर्क अध्यक्ष नयन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ताकतीनिशी लढणार आहे. त्यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची माहिती मनसेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी दिली.

लवकरच चारही तालुक्यांचा दौरा करून जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. मनसे पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक असून इतर पक्षांतील अनेक कार्यकर्तेही संपर्कात आहेत. तसेच आपण स्वतः सरपंच असल्याने जिल्ह्यातील सरपंचांशी चांगला संपर्क असून त्याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला नक्कीच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजपर्यंत पक्षाने जनहिताची अनेक आंदोलने करून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. पाथर्डी येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेला उपजिल्हाध्यक्ष बंडू हंडाळ, पाथर्डी तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, शेवगाव तालुकाध्यक्ष मंगेश पाखरे उपस्थित होते.

COMMENTS