Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव पाडले बंद 

नाशिक प्रतिनिधी - कांदा भाव प्रश्नी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक होत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव

सह्याद्रीच्या कामगारांना जानेवारीपासून 12 टक्के पगारवाढ
 बुलढाणा जिल्ह्यात नाफेड कडून 11 हरभरा खरेदी केंद्रांना मान्यता
अवकाळी पावसाने द्राक्ष, कांद्यानंतर आता भाजीपालाल्या देखील फटका 

नाशिक प्रतिनिधी – कांदा भाव प्रश्नी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक होत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव बंद पाडले. कांद्याच्या बाजार भावाबाबत रोष यावेळी व्यक्त केला. सातत्याने कांद्याचे बाजार भाव पडत असल्याने आज पासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने कांद्याला पंधराशे रुपये क्विंटलचे अनुदान त्वरित जाहीर करावे. तसेच आज जो कांदा तीन, चार, पाच रुपये किलो भाव लिलाव चालू असून तो त्वरित बंद करून कांद्याला 15 ते 20 रुपये किलो भाव द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत कांदयाचे लिलाव सुरू करणार नाही, असा पवित्रा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी घेतला आहे. 

COMMENTS