Homeताज्या बातम्या

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात एसआयआर अंतर्गत अपर जिल्हाधिकार्‍यांची प्रत्यक्ष पाहणीमतदारांच्या घरी भेट देत फॉर्म भरून घेतले; डिजिटायझेशन प्रक्रियेचीही केली तपासणी

विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) अभियानाच्या अनुषंगाने अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड यांनी गुरुवारी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सोमेश

चार महिन्यांसाठी शिक्षक निवडणूक कामात; सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांचे शिक्षण भरकटण्याची भीती
मांजरमच्या रस्त्यांची चाळण; सांडपाणी, खड्ड्यांनी नागरिक हैराण
2026 च्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  पुनर्क्षिण कार्यक्रमास  प्रारंभकेज तालुक्यातील 2 लाख 10 हजार 956 मतदाराची माहिती होणार अद्येयावत



विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) अभियानाच्या अनुषंगाने अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड यांनी गुरुवारी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सोमेश कॉलनी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी त्यांनी मतदारांच्या घरी जाऊन मतदार गणना फॉर्म स्वतः भरून घेतले. तसेच फॉर्मचे प्रत्यक्ष डिजिटायझेशन करून संपूर्ण प्रक्रियेची सखोल तपासणी केली. एसआयआर अभियान प्रभावी, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना त्यांनी आवश्यक सूचना दिल्या. पाहणीदरम्यान तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संजय वारकड, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा महानगरपालिका उपायुक्त नितीन गाढवे उपस्थित होते. यावेळी सोमेश कॉलनी येथील मतदार सुभाषचंद्र लीलाधर शहा तसेच श्वेता वट्टमवार यांनी मतदार गणना प्रक्रियेत सहभाग नोंदविला. या पाहणीवेळी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) एम. एच. पवार, साहेबराव  जाधव, बीएलओ पर्यवेक्षक श्री. ब्याले तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS