Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेल्वेच्या पुणे विभागाची उत्पन्नाची गाडी सुसाट

ऑक्टोबर महिन्यातच तब्बल 99 कोटी रुपयांचा महसूल

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाची रेल्वे गाडी महसूलाच्या बाबतीत देखील सुसाट असल्याचे दिसून येत आहे. कारण पुणे विभागाने ऑक्टोबर महिन्यात 47 लाख

तोतया एसीबीच्या टीमचा छापा; निवृत्त अधिकार्‍याच्या घरी सिनेस्टाईलने लाखो लुटले
Gurugram: मोठी दुर्घटना! स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू | LOKNews24
डेंग्यू नियंत्रणासाठी नऊ राज्यात केंद्रीय पथके

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाची रेल्वे गाडी महसूलाच्या बाबतीत देखील सुसाट असल्याचे दिसून येत आहे. कारण पुणे विभागाने ऑक्टोबर महिन्यात 47 लाख प्रवाशांची वाहतूक केली आहे. त्यातून विभागाला 99.53 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात 24 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
पुणे विभागाने मासिक उद्दिष्टाच्या 25 टक्के अधिक उत्पन्न ऑक्टोबरमध्ये मिळविले आहे. याचबरोबर तिकीट तपासणीतून ऑक्टोबरमध्ये 2.66 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात 1.1 टक्का वाढ नोंदवली गेली. इतर व्यवसायातून रेल्वेला 9.89 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. रेल्वेला पार्सलमधून 2.52 कोटी रुपये आणि इतर वाणिज्य कार्यातून 1.07 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ. स्वप्नील नीला यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी करण्यात आली. पुणे विभागात ऑक्टोबरमध्ये तिकीट तपासणीदरम्यान 23 हजार 145 जण विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून 2 कोटी 3 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच 10 हजार 709 जणांना अनियमित प्रवासासाठी 62 लाख 64 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच सामानाची नोंदणी न करता घेऊन जाणार्‍या 185 जणांकडून 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वेच्या पुणे विभागाने मालवाहतुकीतून ऑक्टोबरमध्ये 42.38 कोटी रुपयांचा महसूल मिळवला. त्यात वाहने, पेट्रोलियम पदार्थ आणि साखरेची वाहतूक करण्यात आली. मासिक उद्दिष्टापेक्षा 22 टक्के आणि मागील वर्षीच्या तुलनेत 41 टक्क्यांची वाढ त्यात नोंदवली गेली, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे यांनी दिली.

COMMENTS