Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुन्या पेन्शनसाठी कर्मचार्‍यांचा संपाचा इशारा

राज्य सरकारचे 17 लाख कर्मचारी 14 मार्चपासून संपावर

औरंगाबाद/प्रतिनिधी ः राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून जुनी पेन्शन योजना राबविण्यासाठी आग्रही मागणी सुरु आहे. यासाठी अने

मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनेल – आशुतोष गोवारीकर
आसमानी  संकटापुढे बळीराजा हतबल 
गतिमान लोकाभिमुख न्यायदानासाठी यंत्रणेचे बळकटीकरण अत्यावश्यक – सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा

औरंगाबाद/प्रतिनिधी ः राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून जुनी पेन्शन योजना राबविण्यासाठी आग्रही मागणी सुरु आहे. यासाठी अनेक वेळेस आंदोलन करूनही यश मिळाले नसल्याने राज्यातील 17 लाख कर्मचार्‍यांनी संपावरण जाण्याचा निर्णय घेतला असून, कर्मचारी 14 मार्च पासून संपावर जाणार आहेत.
राज्य सरकारी कर्मचारी संघटनांची राज्यस्तरीय बैठक शुक्रवारी औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडली. यावेळी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातले सर्व कर्मचारी संपावर जाणार असल्याची माहिती सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे निमंत्रक विश्‍वास काटकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक शुक्रवारी पार पडली. त्यानंतर संघटनेच्या वतीने तापडिया नाट्य मंदिरात मेळावा देखील घेण्यात येत आहे. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत विश्‍वास काटकर यांनी राज्य सरकारी कर्मचारी संघाची भूमिका मांडली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे अविनाश दौंड गणेश देशमुख सुरेंद्र सरतापे देविदास जरारे यांच्यासह महसूल कर्मचारी संघटनेचे मराठवाडा सरचिटणीस महेंद्र गिरगे जिल्हाध्यक्ष परेश खोसरे तलाठी संघाचे राज्याचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS