Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला बे्रक

नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरातील सलग घसरणीला अखेर बुधवारी ब्रेक लागला असून बाजारात अचानक तेजीचा कल दिसून आला आहे. मागील नऊ दिवसांपासून सुरू

राष्ट्रवादीच्या तलवारी म्यान
दुहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलं !
सांगली जिल्ह्यात 1 ली ते 8 पर्यंतच्या शाळा बंद; पालकमंत्री जयंत पाटील यांची घोषणा

नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरातील सलग घसरणीला अखेर बुधवारी ब्रेक लागला असून बाजारात अचानक तेजीचा कल दिसून आला आहे. मागील नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीनंतर दोन्ही मौल्यवान धातूंनी पुन्हा उसळी घेतल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले आहे.
मल्टी कमोडिटी बाजारात चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली. चांदीचा दर सुमारे पाच टक्क्यांहून अधिक वाढून तब्बल बारा हजार रुपयांनी वधारला असून एक किलो चांदीचा दर अंदाजे दोन लाख छत्तीस हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. त्याचबरोबर सोन्याच्या दरातही चार टक्क्यांच्या आसपास वाढ झाली असून दहा ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 44 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही याच प्रवाहाचा परिणाम दिसून आला. डॉलर कमकुवत होणे, कच्च्या तेलाच्या दरात घसरण आणि जागतिक तणाव कमी होण्याच्या शक्यतेमुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाली. प्रति औंस सोन्याचा दर वाढून चार हजार पाचशे डॉलरच्या पुढे गेला, तर चांदीतही लक्षणीय तेजी दिसून आली. तज्ज्ञांच्या मते, पश्‍चिम आशियातील संघर्ष कमी होण्याच्या संकेतांमुळे बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू असल्याच्या बातम्यांमुळे गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे वळला आहे. त्यामुळे सोन्या-चांदीला मागणी वाढली. याशिवाय, कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरण आणि डॉलर निर्देशांकातील कमजोरी यामुळेही मौल्यवान धातूंना आधार मिळाला आहे. डॉलर कमजोर झाल्यास सोन्यातील गुंतवणूक तुलनेने आकर्षक ठरते, असा बाजाराचा कल असतो.
दरम्यान, बाजारातील अनिश्‍चितता पूर्णपणे संपलेली नाही. होर्मुझ सामुद्रधुनीवरील परिस्थिती, आखाती प्रदेशातील लष्करी हालचाली आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यावरील दबाव यामुळे पुढील काळात चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता आहे. ऊर्जा दर वाढल्यास महागाईवरही परिणाम होऊ शकतो. चालू महिन्यात यापूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले होते. काही केंद्रीय बँकांकडून सोन्याची विक्री होत असल्याचीही माहिती समोर येत आहे.

COMMENTS