संगमनेरात अनधिकृतपणे बायोडिझेलची विक्री करणाऱ्या सहा जणांना केले गजा आड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरात अनधिकृतपणे बायोडिझेलची विक्री करणाऱ्या सहा जणांना केले गजा आड

।संगमनेर/प्रतिनिधी : बायोडिझेल खरेदी-विक्रीचा परवाना नसताना सुद्धा अनधिकृतपणे बायोडिझेलची विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकुन पोलिसांनी बायोडिझेल सह

Sangamner : बसमध्ये गळफास घेऊन चालकाची आत्महत्या (Video)
ना. थोरात यांच्या पाठपुराव्यातुन तालुक्यात 5 मेगाहोल्ट पावर ट्रांसफार्मर मंजूर
Sangamner :संगमनेर खुर्द मध्ये 9 लाख रुपयांचा 40 किलो गांजा जप्त

संगमनेर/प्रतिनिधी : बायोडिझेल खरेदी-विक्रीचा परवाना नसताना सुद्धा अनधिकृतपणे बायोडिझेलची विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकुन पोलिसांनी बायोडिझेल सह ११ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्या सर्वांना अटक करण्यात आली आहे

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरातील तिरंगा चौक लगत बेकायदेशीररित्या बायोडिझेल सदृश ज्वलनशील पदार्थाची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची माहिती संगमनेर शहराचे पो.नि. मुकुंद देशमुख यांना गुप्त खबर्याकडून समजली. त्यानंतर पोलीस उपअधिक्षक राहुल मदने व  पो.नि. मुकुंद देशमुख आणि पुरवठा विभागाचे अधिकारी गणेश भालेराव, पिराजी भडकलास मालदाड रसत्यावरील दत्तनगर परिसरात पोहचले. यावेळी त्यांना शंकर उपाध्याय याच्या मोकळ्या प्लॉटमध्ये काही वाहने संशयास्पदरीत्या उभी असल्याचे आढळून आली. पोलिसांनी या ठिकाणी तपाल केला असता, तेथे बायोडिझेलची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीसांच्या पथकाने राहुल रमेश सस्कर (रा.पावबाकी रोड) यास हटकले असता आपण पिकप चालक असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्या सह त्याठिकाणी उभे असणार्या त्या सहा जणांना ताब्यात घेतले  पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सहाही जणांची कसून चौकशी केली असता एका वाहनातून दुसर्‍या वाहनात  बेकायदेशीर रीत्या  बायोडिझेल भरले जात असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याठिकाणाहून ३ लाख १० हजार रुपये किमतीची पिकपजीप, १ लाख ७२ हजार रुपये किमतीच्या दोन टाक्या व फिल्टर मशीन, ६ लाख २५ हजार रुपये किमतीची आयशर गाडी असा एकूण ११ लाख ११ हजार २०० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला.

याप्रकरणी पो.हे.कॉ. अमित महाजन यांनी शहर पोलीसठाण्यात दिलेल्याफिर्यादिवरून पोलिसांनी  राहुल रमेश सस्कर (वय-२७, रा.पावबाकी रोड), मोहम्मद यासीन वाहिद हुसेन (वय-२३, रा. जयपूर, पतरामपूर रस्ता, उधमसी, उत्तराखंड), सुनील मारुती पावसे(वय-३१), संदीप मारुती पावसे(वय-३६), अण्णासाहेब जाधव (वय-३३, तिघेही रा. हिवरगाव पावसा), गणेश दादासाहेब सोनवणे (वय-२४, रा. वेल्हाळे), संजय नरसय्या पगडाल (रा. पद्मनगर संगमनेर) या सहा जणांच्या विरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला असून सहाही जणांना अटक केलीआहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे हे करत आहेत. काल मंगळवार दुपारी सहाही आरोपिंना कोर्टात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुणावण्यात आली.

COMMENTS