कर्जत : अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात महानगरपालिका कर्मचाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद क
कर्जत : अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात महानगरपालिका कर्मचाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद कर्जत शहरात उमटले. या घटनेचा निषेध करत शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. नितीन तोरडमल यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शिवसैनिकांनी कर्जत पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. संबंधित आरोपींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसे निवेदन पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांना यावेळी देण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख डॉक्टर नितीन तोरडमल, ज्येष्ठ नेते शिवाजीराव फाळके, प्रसाद कानगुडे, चंदनसिंग परदेशी, राहुल धोदाड, सुदाम गदादे, उपदेश कातेकर, हर्षद परदेशी, सावता अनारसे, जवान सिंग परदेशी, अजिंक्य परदेशी यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व करणी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कर्जत येथील ग्रामदैवत गोदड महाराज यांचे रथयात्रा असल्यामुळे कर्जत बंद न करता या घटनेचा शिवसैनिकांनी निषेध केला आहे,असे यावेळी बोलताना डॉक्टर नितीन तोरडमल म्हणाले. जर आरोपींवर तात्काळ गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात आली नाही. त्यांच्या मालमत्ता बुलडोझर लावून पाडून टाका नाही तर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील. असा इशारा तोरडमल यांनी यावेळी दिला. यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते शिवाजीराव फाळके म्हणाले की, या घटनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त केला असून. प्रशासनाने दोषींना पाठीशी घालू नये, कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी बोलताना केली.

COMMENTS