Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पद्माकर वळवी यांची काँगे्रसला सोडचिठ्ठी

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

मुंबई ः राज्यात एकीकडे काँगे्रस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा दाखल झाली असतांना, या यात्रेच्या दुसर्‍या दिवशी म्हण

Nanded : गुरफळीचे दुग्ध व्यावसायिक करतायेत नदीतून प्रवास (Video)
अमरावतीत संचारबंदीमध्ये मिळाली शिथिलता | LOKNews24
पाण्याचे नियोजन व्हावे

मुंबई ः राज्यात एकीकडे काँगे्रस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा दाखल झाली असतांना, या यात्रेच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे बुधवारी नंदुरबार येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आदिवासी समाजाचा चेहरा असणारे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश केला. पद्माकर वळवी यांच्या भाजप प्रवेशामुळे हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. आदिवासी समाजाच्या मतांसाठी एकीकडे राहुल गांधी यांनी आदिवासी समाजाला कालच्या मेळाव्यात साद घातलेले असतानाच एक आदिवासी नेता काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याची टीका भाजपच्या नेत्यांनी केली आहे.
मुंबईमध्ये पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. वळवी यांच्यासोबतच तळोदा काँग्रेसच्या माजी नगराध्यक्ष तारा बागुल तसेच त्यांचे पुत्र महेंद्र कलाल यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पद्माकर वळवी यांच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजपला एक नवा चेहरा मिळाला आहे. नांदेड मधील भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांची देखील यावेळी उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पद्माकर वळवी यांनी काम पाहिले आहे. ते राज्याचे क्रीडामंत्री देखील होते. पद्माकर वळवी यांची मुलगी देखील काँग्रेसमध्ये सक्रिय असून त्या नंदुरबार जिल्हा परिषद मध्ये वर्चस्व असणार्‍या नेत्यांपैकी एक आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात वळवी कुटुंबीयांचे वर्चस्व दिसून येते. मात्र, आता त्यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीवर देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS