Homeताज्या बातम्या

अनाथांचे नाथच्या आदर्शावर सरफराज काझी यांचा समाजाभिमुख वाढदिवसफळे व शैक्षणिक साहित्य वाटप करून अनाथ चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर फुलवले हास्य

बीड : सामाजिक बांधिलकी जपत शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे बीड जिल्हाध्यक्ष सरफराज काझी यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. पाली येथील आ

नांदेड विधान परिषद निवडणुकीतील सस्पेन्स उद्या संपणार? उमेदवारी माघारीच्या अंतिम दिवशी राजकीय चित्र स्पष्ट होणार
ठाकरे गटाचे आमदारही फूटीच्या उंबरट्यावर ?उद्धव ठाकरेंनी उद्या मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक
ठाकरे गटाला धक्क्यांमागून धक्केे !


बीड : सामाजिक बांधिलकी जपत शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे बीड जिल्हाध्यक्ष सरफराज काझी यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. पाली येथील आनंदग्राम अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करत त्यांनी फळे व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ उत्सव न करता गरजू व अनाथ विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलवण्याचा उपक्रम राबवत सरफराज काझी यांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला. अनाथांचे नाथ म्हणून ओळखले जाणारे धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सामाजिक कार्याच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. साहित्य व फळे मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून आला. उपस्थित मान्यवरांनी सरफराज काझी यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सय्यद रेहान, शोएब शेख, शेख फैसल, शेख अबरार, शेख अवेज, मतीन पटेल तसेच इन्फंट इंडियाचे बारगजे कुटुंबीय उपस्थित होते.

COMMENTS