Homeताज्या बातम्या

चांदणी चौकात वाहतूक नियमभंगाविरोधात पोलिसांची विशेष मोहीम; नियम तोडणाऱ्या वाहनचालकांकडून ९,७०० रुपयांचा दंड वसूल

बीड: शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत शिस्त निर्माण करण्याच्या उद्देशाने बीड पोलिसांकडून विशेष मो

ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट! ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा दिमाखात शुभारंभ
श्री. राजाभाऊ लोमटे म्हणजे कामाप्रती प्रामाणिक आणि सहकार्य वृत्ती जोपासणारे व्यक्तिमत्त्व : मा. नवनाथराव थोटे
टाकळी प्रकरणातील आरोपींना अटक करून कारवाई करा! निष्पाप तरुणाचा मृत्यू अत्यंत वेदनादायी: खा. बजरंग सोनवणे

बीड: शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत शिस्त निर्माण करण्याच्या उद्देशाने बीड पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. दि. २३ जून २०२६ रोजी पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्या आदेशानुसार पोलीस स्टेशन हद्दीतील चांदणी चौक परिसरात मोटार वाहन कायद्यांतर्गत ही विशेष तपासणी मोहीम घेण्यात आली.

विनानंबर आणि फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाई

या धडक कारवाईदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कठोर कायदेशीर पावले उचलली. यामध्ये प्रामुख्याने विनानंबर वाहने, फॅन्सी नंबर प्लेट लावलेली वाहने, ट्रिपल सीट प्रवास करणारे, वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) नसलेले चालक, तसेच कर्कश हॉर्न व कर्कश सायलेन्सर वापरून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेत पोलिसांनी एकूण ९ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कायदेशीर कारवाईचा इशारा

दंडात्मक कारवाई करण्यासोबतच पोलिसांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करणे, हेल्मेटचा नियमित वापर करणे आणि रस्त्यावर जबाबदारीने वाहन चालविण्याबाबत मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक निलेश केळे यांनी वाहनचालकांना नियमांचे उल्लंघन केल्यास यापुढेही कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे, पोलीस अंमलदार अल्ताफ शेख आणि शिवाजी राख यांनी संयुक्तपणे पार पाडली. बीड शहरातील वाहतूक शिस्त कायम राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

COMMENTS