Homeताज्या बातम्या

पेठ बीड डीबी पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा.2.07 लाखांचा मुद्देमाल जप्त,सहा जुगारी ताब्यात

बीड शहर व परिसरात वाढत असलेल्या अवैध जुगार व्यवसायावर पेठ बीड पोलिसांनी मोठी कारवाई करत बलभीम नगर परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाई

सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक अल्ताफ शेख यांची बीडच्या ऐतिहासिक वैभवाला भेटकारंजा टॉवर, कंकालेश्वर मंदिर, शहिंशाहवली व मन्सूरशहा दरगाह रुपेरी पडद्यावर आणण्याची इच्छा
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदलेले सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अल्ताफ शेख बीडमध्ये येणारसा. ‘युवा लोकमित्र’च्या वर्धापन दिन पुरस्कार वितरण सोहळ्यात विशेष उपस्थिती
चांदणी चौकात वाहतूक नियमभंगाविरोधात पोलिसांची विशेष मोहीम; नियम तोडणाऱ्या वाहनचालकांकडून ९,७०० रुपयांचा दंड वसूल



बीड शहर व परिसरात वाढत असलेल्या अवैध जुगार व्यवसायावर पेठ बीड पोलिसांनी मोठी कारवाई करत बलभीम नगर परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत सहा जुगार्‍यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, पत्ते व इतर जुगार साहित्य असा एकूण 2 लाख 7 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, बलभीम नगर परिसरात काही जण पत्त्यांच्या माध्यमातून जुगार खेळत आहेत. या माहितीच्या आधारे रविवारी (दि. 28 जून 2026) सापळा रचून छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान सहा जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख व पोलीस उपअधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक मन्सूर शहा यांच्यासह पो.नितीन राठोड,पो.ह.अल्ताफ शेख,पो.शिवाजी राख,पो.विष्णू गुजर, पो.पांडुरंग परझणे यांनी कारवाई केली. शहरात वाढत्या जुगार व्यवसायावर पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे चालविणार्‍यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS