Homeताज्या बातम्या

केतन अग्रवाल हत्याप्रकरणी टिप्पणी महागातडॉक्टर मुस्कान सोनीचे पाच वर्षांसाठी निलंबन

पुणे : पुण्यातील उद्योजक केतन अग्रवाल यांच्या हत्येबाबत सामाजिक माध्यमांवर कथितरीत्या आक्षेपार्ह आणि असंवेदनशील टिप्पणी केल्याप्रकरणी मध्य प्रदेश

अंदाज समितीच्या आदेशाकडे दुर्लक्ष? बिलोलीतील अधिकार्‍यांच्या निलंबनास विलंब; नांदेड दौर्‍याच्या निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह
ठाणे महापालिकेचे उपायुक्त निलंबित
कोट्यवधींचा आरोग्य निधी वाया, खाबूगिरीला लगाम; डॉ. संगीता देशमुख निलंबित
Ketan Agarwal Murder : सर्वात मोठी बातमी... केतन मर्डर प्रकरणात पहिली मोठी कारवाई, थेट डॉक्टरच... मोठी अपडेट काय? - Marathi News | Ketan Agarwal Murder Case : Dr. Muskan Soni ...


पुणे : पुण्यातील उद्योजक केतन अग्रवाल यांच्या हत्येबाबत सामाजिक माध्यमांवर कथितरीत्या आक्षेपार्ह आणि असंवेदनशील टिप्पणी केल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील दंतवैद्य मुस्कान सोनी हिच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. अखिल भारतीय दंतविद्यार्थी व दंतचिकित्सक संघटनेने तिला पाच वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या एका चित्रफितीत मुस्कान सोनी हिने केतन अग्रवाल यांच्या हत्येचा संदर्भ देत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप झाला होता. ही चित्रफीत मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्यानंतर विविध स्तरांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेक नागरिक, सामाजिक संघटना आणि व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींनी अशा वक्तव्यांचा निषेध नोंदवित कठोर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणात संबंधित चित्रफितीत केतन अग्रवाल यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी केलेल्या उल्लेखांमुळे वाद अधिक चिघळला. संवेदनशील घटनेवर विनोद अथवा उपहासात्मक भाष्य करणे समाजमनाला वेदना देणारे असल्याची प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त करण्यात आली. वाद वाढताच मुस्कान सोनी हिने सार्वजनिकरीत्या माफी मागितली. आपल्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या गेल्याबद्दल खेद व्यक्त करत संबंधित टिप्पणी अयोग्य होती, अशी कबुली तिने दिली. तथापि, केवळ माफी पुरेशी नसल्याचे मानत संघटनेने तिच्यावरील निलंबनाची कारवाई कायम ठेवली आहे. संघटनेच्या निर्णयानुसार, पुढील पाच वर्षे मुस्कान सोनीला संघटनेच्या कोणत्याही उपक्रमात सहभागी होता येणार नाही. वैद्यकीय आणि दंतचिकित्सा क्षेत्रातील व्यक्तींनी सार्वजनिक जीवनात जबाबदारीने व संवेदनशीलतेने वागणे आवश्यक असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आल्याचे मानले जात आहे.

COMMENTS