Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वडगाव माहूरे येथील नागरिकांचे बेमुदत उपोषण अखेर 9 व्या दिवशी सुटले 

अमरावती प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील वडगाव माहुरे या गावातील  45 कुटूंब अनेक वर्षांपासून नागरी सुविधेचा अभाव आहे. त्यामुळे या कुटुंबीयांना

“लगन”चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित (Video)
बोअरवेलमध्ये पडला चिमुकला, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओ | LOK News 24
मीरा भाईंदरमध्ये आता रस्ते-पदपथ राहणार चकाचक

अमरावती प्रतिनिधी – अमरावती जिल्ह्यातील वडगाव माहुरे या गावातील  45 कुटूंब अनेक वर्षांपासून नागरी सुविधेचा अभाव आहे. त्यामुळे या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरी सुविधा तत्काळ देण्यात यावे, या मागणीला घेऊन अनेक दा  जिल्हा प्रशासनाला निवेदने देण्यात आले होते. परंतु,आजवर मागण्या पूर्ण झाल्या नसल्याचा आरोप वडगाव माहुरे या गावातील  45 कुटूंब लाभार्थ्यांनी काल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सांगितले. आम्ही गेल्या नऊ दिवसापासून भिम ब्रिगेड संघटनेच्या मार्फत अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरु होते.आमच्याकडे कोणत्याच अधिकाऱ्यांचे लक्ष नव्हते. आमच्यातले काही उपोषण करते अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुद्धा घेत होते. तरीपण कोणत्याच अधिकाराचे या उपोषणाकडे लक्ष नव्हते. 

 काल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सांगण्यावरून आज आम्ही उपोषण सोडत आहे.

COMMENTS