महसूल विभागाने अवैध वाळू वाहतुकीप्रकरणी जप्त करून गेवराई बस आगारात ठेवलेला ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली हो

महसूल विभागाने अवैध वाळू वाहतुकीप्रकरणी जप्त करून गेवराई बस आगारात ठेवलेला ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या गंभीर गुन्ह्याचा वेगाने तपास करत गेवराई पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत चोरीस गेलेला ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करून संबंधित आरोपींना अटक केली.
हिंगणगाव (ता. गेवराई) येथील तलाठी चंद्रकांत बाबुराव बत्तुलवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महसूल विभागाच्या पथकाने 29 एप्रिल 2026 रोजी अवैध वाळू वाहतूक करताना स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर-ट्रॉली व एक छोटा हत्ती वाहन जप्त केले होते. ही वाहने सुरक्षेच्या दृष्टीने गेवराई बस आगार परिसरात ठेवण्यात आली होती. दरम्यान, 28 जून 2026 रोजी पहाटे सुमारे 2.15 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी जप्त केलेला ट्रॅक्टर-ट्रॉली तेथून चोरून नेला. या घटनेनंतर गेवराई पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच गेवराई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 24 तासांत चोरीस गेलेला ट्रॅक्टर-ट्रॉली हस्तगत केला तसेच या प्रकरणातील आरोपींना अटक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार (पोह/223) कल्याण राठोड हे करत आहेत. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके आणि पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुलकुमार लांडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान दौड तसेच पोलीस कर्मचारी अशोक हंबर्डे, कल्याण राठोड, गोरक्ष डोके, धिरज खांडेकर, विनोद कुटे, नारायण सदवदे आणि राजेंद्र चोरमले यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

COMMENTS