Homeताज्या बातम्या

सोलापूरच्या आयटीआयमध्ये धार्मिक छळविद्यार्थिनींच्या छळाच्या तक्रारींच्या चौकशीसाठी विशेष पथक दाखल

सोलापूर : डफरीन चौक येथील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थिनींचा मानसिक व धार्मिक छळ होत असल्याच्या आरोपांमुळे वाद निर्माण झ

शिरपूर फर्स्टचे MSEB कार्यालयावर ठिय्या आंदोलन
अल्पसंख्याक संरक्षण कायद्यासाठी लोकसेना राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामासमाजाला संरक्षण मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवणार-अ‍ॅड.प्रा. इलियास इनामदार
डमी प्रवेशांना लगाम; कोचिंग लॉबीवर शिक्षण विभागाचा मोठा प्रहार!नांदेडमधील 256 कनिष्ठ महाविद्यालयांत बायोमेट्रिक हजेरी सक्तीची; 75 टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती असेल तर 12 वी परीक्षा धोक्यात


सोलापूर : डफरीन चौक येथील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थिनींचा मानसिक व धार्मिक छळ होत असल्याच्या आरोपांमुळे वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा सकल हिंदू समाजाने दिला आहे.
या पार्श्‍वभूमीवर संस्थेतील विविध तक्रारींची पडताळणी करण्यासाठी पुणे विभागाच्या उपसंचालकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक शुक्रवारी सोलापूर दौर्‍यावर आले असून संस्थेतील प्रशासकीय कामकाजासह विविध आरोपांची चौकशी करत आहे. यापूर्वीही व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या उच्चस्तरीय चौकशी समितीने संस्थेला भेट देऊन काही विभागांतील विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला होता. समितीने विद्यार्थिनींच्या तक्रारी आणि अनुभवांची नोंद घेतली असून, त्यावर आधारित अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संस्थेतील काही अधिकार्‍यांकडून हिंदू विद्यार्थिनींना कुंकू व टिकली लावण्यावरून टोमणे मारले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थिनींना मानसिक त्रास दिला जात असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थिनींना बळजबरीने गणवेश खरेदी करण्यास भाग पाडणे, नियमबाह्य पद्धतीने तासिका तत्त्वावरील कर्मचार्‍यांची नियुक्ती करणे आणि महिला शिक्षण संस्थेत सुरक्षा निकषांकडे दुर्लक्ष करून पुरुष सफाई कर्मचार्‍यांची नियुक्ती करणे, अशा मुद्द्यांवरही आक्षेप नोंदविण्यात आला आहे. काही सामाजिक संघटनांनी यापूर्वी झालेल्या चौकशी प्रक्रियेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. आधीच्या चौकशी समितीने संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे नव्या चौकशीकडून वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS