Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगावच्या बी डी ओ सोनल शहा यांची अखेर बदली रद्द

https://www.youtube.com/watch?v=E0R-GbGX7TM शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शहा यांच्या कोपरगाव येथे झालेल्या बदलीचा निर्णय अखे

शिलाई मशिनच्या नावाखाली ४३९ महिलांना गंडा; लाखो रुपये घेऊन भामटा पसार!
शिवसेना जात-धर्मापलीकडे काम करणारा पक्ष : बाफना  उपमुख्यमंत्री शिंदेंच्या माध्यमातून रुग्णास दोन लाखाची मदत
पिंगेवाडीमध्ये डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन  

शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शहा यांच्या कोपरगाव येथे झालेल्या बदलीचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला असून, शेवगाव सह तालुक्याच्या पूर्व भागातील पत्रकार संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे , या निर्णयामुळे तालुक्यातील सुरू असलेल्या विकास कामांना आता दिलासा मिळणार आहे .
सोनल शहा यांनी अल्पावधीतच शेवगाव तालुक्यात प्रशासकीय कामकाजाला गती देत विविध लोकहिताच्या योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे पंचायत समितीतील अनेक प्रलंबित कामे मार्गी लागली असून, शासनाच्या योजनांची अंमलबजावणीही वेगाने सुरू होती . त्यामुळे त्यांच्या अचानक बदलीमुळे विकास कामांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने
या पार्श्वभूमीवर शेवगावसह पूर्व भागातील पत्रकार संघाने एकत्र येत जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्याकडे निवेदन सादर करून बदली रद्द करण्याची मागणी केली होती. पत्रकार संघाच्या या ठाम भूमिकेला यश मिळत अखेर प्रशासनाने बदलीचा निर्णय मागे घेतल्याने सुरू असलेल्या विकासकामांना अधिक वेग मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे

COMMENTS