Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्हा डिफेन्स उत्पादनाचे मुख्य हब मुख्यमंत्री फडणवीस ; शिर्डीतील क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे लोकार्पण

शिर्डी :  आजचा दिवस देशाच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात ऐतिहासिक आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत'चा जो संदेश द

सहा कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित
डॉ. हेडगेवार शिक्षणशास्त्र महाविद्यालयात; वार्षिक पारितोषिक व दीक्षांत समारंभ उत्साहात
मळगंगा देवीच्या यात्रोत्सवास प्रारंभ;शेकडो महिलांची उपस्थिती;  भक्तिमय वातावरणात जल्लोष


शिर्डी :  आजचा दिवस देशाच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात ऐतिहासिक आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’चा जो संदेश दिला होता, त्याची यशस्वी अंमलबजावणी आज होताना दिसत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाने संरक्षण क्षेत्रात इतकी मोठी प्रगती केली आहे की, आज आपला देश केवळ स्वावलंबी बनला नसून संरक्षण साहित्याचा मोठा निर्यातदार बनला आहे. आपला अहिल्यानगर जिल्हा हा डिफेन्स उत्पादनाचे मुख्य हब बनला आहे. केवळ इथेच नाही, तर नाशिक, पुणे आणि नागपूर मध्ये देखील असाच भव्य ‘डिफेन्स कॉरिडॉर’ तयार केला जाणार आहे. या प्रकल्पांना संरक्षणमंत्र्यांनी देखील मंजुरी दिली आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 शिर्डीच्या एमआयडीसी परिसरात 200 एकर जागेवर उभारण्यात आलेल्या भव्य क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे भव्य लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
 पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्राच्या मातीतील ग्रामीण भागातील युवक गणेश निबे यांनी जे काम इथे उभे केले आहे, ते अत्यंत गौरवास्पद आणि कौतुकास्पद आहे. निबे यांच्याकडे प्रचंड आत्मविश्वास होता आणि याच आत्मविश्वासाच्या बळावर हा भव्य प्रकल्प आज उभा राहिला आहे. त्यांनी या ठिकाणी जी उत्पादने तयार केली आहेत, ती देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.”


365 दिवस पुरतील इतके उत्पादन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या ठिकाणी जे तोफगोळे तयार होणार आहेत, ते खूप महत्त्वाचे काम आहे. वर्षभर या प्रकल्पात उत्पादनाचे काम अखंडपणे सुरू राहील, अशी अजोड तयारी त्यांनी केली आहे. निबे यांनी 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंत अचूक मारा करणारी क्षेपणास्त्रे निर्माण केली आहेत. जर देशावर युद्धाची वेळ आली, तर 360 ते 365 दिवस सलग दारूगोळा पुरवण्याची क्षमता या एकाच प्रकल्पात आहे.


फडणवीसांचा रेल्वेने प्रवास
या कार्यक्रमासाठी येताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही खाजगी चॉपर, विमान किंवा गाड्यांचा मोठा ताफा न वापरता मुंबई ते शिर्डी असा प्रवास ‘वंदे भारत एक्सप्रेस’ने केला. पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी हा निर्णय घेतला, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

COMMENTS